Photo Credit - BCCI

Australian Men's National Cricket Team vs India National Cricket Team:  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा चौथा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवसअखेर मजबूत स्थितीत असल्याचे दिसून आले. सामन्याच्या पहिल्या दिवसादरम्यान विराट कोहलीने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला एक खास सल्ला दिला आणि त्याच्याशी (ऑस्ट्रेलियन खेळाडू) हसत बोलू नये, असे सांगितले. कोहली आणि सिराज यांच्यातील या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  (हेही वाचा -  IND vs AUS 4th Test 2024: मेलबर्न कसोटीत भारताची सलामीची जोडी बदलेल, रोहित शर्मा डावाची सुरुवात करेल)

मोहम्मद सिराज ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुशेनला काहीतरी म्हणत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान भारतीय गोलंदाज हसताना आणि लॅबुशेनशी बोलताना दिसला. हे संभाषण पाहून विराट कोहलीने सिराजला सांगितले की, त्याच्याशी हसून बोलू नकोस.

सिराजला पहिल्या दिवशी एकही विकेट मिळाली नाही

बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाज जवळपास फ्लॉप दिसले. मात्र, दरवेळेप्रमाणे या वेळीही बुमराहने शानदार गोलंदाजी करत 3 बळी घेतले. तर बुमराहला साथ देणाऱ्या मोहम्मद सिराजला पहिल्या दिवशी एकही विकेट घेता आली नाही. सिराजने पहिल्या दिवशी 15 षटके टाकली, ज्यात त्याने 4.60 च्या इकॉनॉमीने 69 धावा दिल्या.