विराट कोहलीचा नवा ‘रेट्रो’ लूक पाहून चाहते इम्प्रेस (Photo Credit: Twitter/Facebook)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर 'ओपन नेट्स विथ मयंक' या नव्या पर्वाचा टीझर शेअर केला ज्यात कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) एका नव्या लूकमध्ये दिसला. केस आणि दाढी घेऊन फिरणे पसंत करणाऱ्या कोहलीने सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान आपला लूक पूर्णपणे बदलला आहे. लॉकडाऊन दरम्यान, आपल्या चाहत्यांना त्यांच्या आयुष्याविषयी अपडेटेड ठेवत विराट नियमितपणे सोशल मीडियावर पोस्ट करत असायचा. भारतीय कर्णधाराच्या दाढीत लक्षणीय वाढ झाली आहे, तर त्याच्या टीम इंडियाच्या सहकारी मयंक अग्रवालशी झालेल्या संभाषणादरम्यान त्याने जुन्या काळातील चष्मा घातल्याचेही दिसून आले. विराटचा हा नवीन 'रेट्रो' लुक पाहून त्याचे चाहतेही इम्प्रेस झाले. इतकच नाही तर त्यांनी 'रईस' (Raees) चित्रपटातील शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि Money Heist वेबसीरीजमधील प्राध्यापकाच्या लुकशी तुलना केली. (विराट कोहलीच्या नव्या लॉकडाऊन लूकने चाहते चकित, वाढलेल्या केस आणि दाढीत असा दिसत आहे टीम इंडियाचा कॅप्टन, पाहा Viral Photos)

बीसीसीआय टीव्हीच्या माध्यमातून सलामी फलंदाज मयंक 'ओपन नेट्स विथ मयंक' या कार्यक्रमात विविध क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेतो. या कार्यक्रमात आगामी मुलाखत कर्णधार विराटची आहे ज्याचा टीजर बीसीसीआयच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला. त्यावेळी विराटचा नवा रेट्रो लूक समोर आला आणि त्याने स्वत:च रेट्रो लूकबद्दल सांगितलं. "छान ग्लासेस", मयंक म्हणला, "थँक्स मॅन, रेट्रो आहे," मयंकच्या कौतुकाला भारतीय कर्णधाराने उत्तर दिले.

पाहा विराटच्या मुलाखतीचा टीजर:

टीम इंडिया कर्णधाराच्या लुकवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहा:

नव्या लूकसह कॅप्टन आणखी हुशार दिसत आहे

कोहली मनी हेरिस्टचा प्राध्यापक दिसत आहेत

रईसच्या शाहरुखसारखा दिसतोय

रईस शाहरुख वाला लुक

प्रोफेसर कोहली

यापूर्वी लॉकडाऊन दरम्यान सलून बंद असल्याने कोहलीला त्याची पत्नी अनुष्का शर्मा घरी नवीन हेअर कट देताना पाहिले होते. कोरोनामुळे सर्व भारतीय क्रिकेटपटू सध्या आपल्या घरांमध्येच कैद आहेत. काही खेळाडूंनी मैदानावर प्रशिक्षण सुरु केले आहे, तर मुंबई शहरात कोरोनाचा प्रभाव जास्त असल्याने येथे स्थित खेळाडूंना अद्याप बाहेर पडून सराव करण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आलेली नाही.