Virat Kohli New Look: विराट कोहलीच्या नव्या लॉकडाऊन लूकने चाहते चकित, वाढलेल्या केस आणि दाढीत असा दिसत आहे टीम इंडियाचा कॅप्टन, पाहा Viral Photos
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्र सिंह धोनीप्रमाणेच भारतीय संघातील इतरही काही खेळाडूंनी लॉकडाऊनमध्ये दाढी वाढवली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यापैकी एक खेळाडू आहे. विराटचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) काही काळापूर्वी लॉकडाऊनमध्ये (Lockdown) नव्या रुपात चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. महिनाभरापूर्वी धोनी आपल्या सफेद दाढीमध्ये बराच म्हातारा दिसला होता. धोनीप्रमाणेच भारतीय संघातील इतरही काही खेळाडूंनी लॉकडाऊनमध्ये दाढी वाढवली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यापैकी एक खेळाडू आहे. विराटचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोहलीचे नवीन व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये त्याने दाढी आणि केस वाढवलेले दिसत आहे. कोहली सध्या पत्नी अनुष्का शर्मासमवेत मुंबईच्या घरात राहत आहे. मुंबई सर्वात जास्त कोरोना व्हायरसग्रस्त (Coronavirus) शहरांपैकी एक आहे. या लॉकडाऊनमध्ये कोहली सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव असतो आणि व्यायाम करत असतानाचे व्हिडिओ आणि फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत राहतो. (अरे देवा! विराट कोहली आपल्या घरात मोजमाप करून खाणं करतो सुनिश्चित, पत्नी अनुष्का शर्माने शेअर केली झलक Watch Video)
विराट नवीन लॉकडाऊन लुकमध्ये लांब केस आणि वाढलेल्या दाढीमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये विराटने चष्मा देखील घातलेला दिसत आहे. विराटच्या या नव्या लूकवर एक नजर टाकूया जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Virat Kohli Recent Look
With Long Hair & Long Beard🔥😍
ReTweet🙌
If You're Waiting For a
Photoshoot With This Stunning Look😎💥❣️ pic.twitter.com/RjKOHoiRIs
— Virat Kohli Trends™ (@TrendVirat) July 8, 2020
लॉकडाऊनमुळे इतर क्रिकेटर्सप्रमाणे कोहलीलाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही. शिवाय, भारताच्या अन्य राज्यांमध्ये लॉकडाऊन नियम शिथिल करण्यात आल्याने काही खेळाडूंना ओउटडोर सराव करण्याची संधी मिळाली आहे. पण, मुंबईमध्ये कोरोना स्थिती गंभीर असल्याने विराटसह रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांना अद्याप घरा बाहेर पडून सराव करण्याची संधी मिळालेली नाही. कोहली सध्या क्रिकेट सुरू होण्याची वाट पाहत आहे. अलीकडेच, तो आणि हार्दिक पंड्याचे पुश-अप चॅलेंजमध्ये व्यस्त होते आणि चाहत्यांनाही त्यांची हा अंदाज खूप आवडला. इतर क्रिकेटपटूंप्रमाणे कोहलीही मार्चपासून आपल्या घरात कैद आहे. न्यूझीलंड दौर्यानंतर त्याने स्पर्धात्मक क्रिकेट खेळला नाही. पण, खेळापासून दूर असताना कोहली सोशल मीडियावर बर्यापैकी सक्रिय होता. लाईव्ह मुलाखतीत भाग घेण्यापासून ते सह खेळाडूंना त्यांच्या पोस्टवर मजेदार प्रतिक्रिया देणे, त्याने हे सर्व सोशल मीडियावर केले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 14, 2020 12:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

