विराट कोहली (Photo Credit: Getty)

जगातील एक सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि सर्व फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करणारा विराट कोहलीने (Virat Kohli) आधुनिक काळातील महान खेळाडू म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. कोहली जागतिक क्रिकेटमधील कामगिरीसाठी परिचित आहे आणि त्याच बरोबर त्याच्या फिटनेसचे चाहतेही भरपूर आहेत. विराट त्याच्या फिटनेसबाबत (Virat Kohli Fitness) खूप जागरूक आहे आणि त्याच्या व्यायामापासून खाण्यापर्यंत विशेष लक्ष देतो. कोहलीच्या सातत्यपूर्ण कामगिरीत त्याचे फिटनेसही महत्त्वपूर्ण योगदान आहे, एक काळ असा होता जेव्हा तो तंदुरुस्तीकडे अधिक लक्ष देत नसायचा. अलीकडेच त्याने आपला तो जुना वेळ आठवला जेव्हा त्याला कळले की उच्च स्तरावर यशस्वी होण्यासाठी आपण पुरेसे प्रयत्न करीत नाही. नुकताच मयंक अग्रवाल यांच्याशी बोलताना ते म्हणाले की, आयपीएल 2012 हंगामानंतर स्वत:ला पाहून निराश झाला आणि मग त्याने प्रशिक्षणाप्रमाणे बदलण्याचा निर्णय घेतला. (विराट कोहली बनला 70 मिलियन इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेला पहिला भारतीय, पण जागतिक स्तरावरील चौथा खेळाडू, पाहा लिस्ट)

जगभरातील क्रिकेट बदलत आहे आणि तंदुरुस्तीच्या दृष्टीने संघ चांगले होत आहेत, असेही कोहलीने ठामपणे सांगितले आणि त्याला असे वाटत होते की भारत त्या पातळीवर फारसा नसलेला जाणून त्याला त्रास झाला. "2012 आयपीएलनंतर मी घरी परतलो, स्वत:ला पाहिलं, मला वैताग आला होता आणि मी स्वतःला बदलायचं ठरवलं व जगभरातील क्रिकेटची गतिमानता झपाट्याने कशी बदलत आहे हे मी पाहिलं होतं. मला वाटले की आम्ही इतर संघांसारख्या तीव्रतेच्या पातळीवर असण्याच्या बाबतीत खूप मागे आहोत, फिटनेस पातळीच्या बाबतीत ते आमच्यापेक्षा खूप पुढे होते," कोहलीने मयंकला 'ओपन नेट्स विथ मयंक' शो दरम्यान सांगितले. त्यानंतर त्याचा आहार कसा खराब होता हे देखील कोहलीने उघड केले आणि तो 40 टॉफींचा 4-5 पॅक पूर्ण खायचा. भारतीय कर्णधार म्हणाला की त्याच्यासमोर असलेले सर्व काही खायचा आणि खूप झोपायचा.

2011 आयपीएलमध्ये विराटने 557 धावा केल्या पण पुढच्या सत्रात तो समान पातळीवर कामगिरी करू शकला नाही आणि आयपीएल 2012 च्या 16 सामन्यात 364 धावा केल्या. 2012 आयपीएलमधील त्याच्या खराब मोहिमेने कोहलीच्या मानसिकतेत मोठा बदल केला आणि त्याने आपला आहार व प्रशिक्षण बदलण्यास प्रवृत्त केले. "त्यामुळे त्या विशिष्ट प्रक्रियेस बदलण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल मला खरोखरच त्रास झाला आणि प्रथम ते वैयक्तिक पातळीवर सुरू झाले. आणि ही जाणीव आयपीएल 2012 नंतर माझ्यासमोर आली की मी माझ्यासमोर जे असायचे ते खायचो. आयटीसी गार्डेनिया जिथे आम्ही राहायचो, त्यांच्याकडे इक्लेअर टॉफीचे एक पॅकेट होते आणि ते प्रत्येक वेळी मिनी-बार पुन्हा भरायचे आणि मी 4-5 दिवसात एक पॅक पूर्ण संपवायचो. ते 40 टॉफींचे पॅक होते जे त्यावेळी माझा आहार होता," कोहली म्हणाला.