![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/1-20170355.jpg?width=380&height=214)
Virat Kohli: विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नसेल पण त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जे शिखर गाठले आहे ते आजच्या काळात कोणालाही जमलेले नाही. त्यामुळे देशभरात त्याचा प्रचंड चाहता वर्ग आहे. गेली कित्येक वर्ष विराट भारतासाठी खेळत आहे. अजूनही त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. अशाच एका महिला चाहतीला भेटण्यासाठी विराटने (Virat Kohli) काही सुरक्षेकडे दुर्लक्ष करत तिला मिठी मारली. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (IND vs ENG 3rd ODI 2025: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माला 'हा' विक्रम करण्याची सुवर्णसंधी, सचिन तेंडुलकरला टाकू शकतो मागे)
कटकमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा चार विकेट्सने पराभव केला. त्या सामन्यात कोहलीला फक्त पाच धावा करता आल्या. पण यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये कधी फारसा फरक पडला नाहीये. सामना संपल्यानंतर कोहली तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी अहमदाबादला रवाना होत होता. तो भुवनेश्वर विमानतळावर असताना एका महिला चाहत्याने माजी भारतीय कर्णधाराला मिठी मारण्याची विनंती केली. कोहलीनेही महिलेला निराश न करता तिला मिठी मारली.
विराट कोहलीला महिला चाहतीने मारली मिठी
That Hug 🥺❤️ pic.twitter.com/nSkwhmtZUs
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) February 10, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारत आणि इंग्लंडमधील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना
कटकमध्ये विजय मिळवून भारताने तीन सामन्यांची मालिका जिंकली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना 12 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे खेळला जाईल. यानंतर दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रवाना होतील. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आपले सामने दुबईमध्ये खेळेल. तर इंग्लंड आणि इतर संघ त्यांचे सामने पाकिस्तानमध्ये खेळतील.