विराट कोहलीला कारकीर्दीच्या सर्वात वाईट टप्प्यात 'या' भारतीय दिग्गजांनी दिला गुरु मंत्र, पाहा 2014 इंग्लंड दौऱ्याने कसा बद्दल विराटचा खेळ (Watch Video)
विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

विराट कोहलीने स्वत: च्या पिढीतील एक महान फलंदाज ओळख निर्माण केली आहे, परंतु या शिखरावर पोहोचण्यासाठी शंका आणि सतत पुनरुत्थानावर मात करण्याचा एक मोठा प्रवास त्याला करावा लागला आहे. 2014 इंग्लंड दौऱ्यानंतर त्याचा करिअर खाली जात असल्याचे विराटला वाटले होते. त्या दौऱ्यावर त्याने पाच कसोटी सामन्यांमध्ये 13.5 च्या सरासरीने केवळ 134 धावा केल्या होता. भारताला त्या दौऱ्यावर कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी तो दौरा विराटसाठी महत्वपूर्ण ठरली. कोहली म्हणाला की 2014 इंग्लंड दौरा त्याच्या कसोटी कारकीर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. 2014 इंग्लंड दौर्‍यावर गेलेल्या भारतीय संघात विराट कोहली हा सर्वात खराब कामगिरी करणारा होता. त्यावेळी एमएस धोनी संघाचा कर्णधार होता. त्या ,मालिकेत विराटने एकही अर्धशतक ठोकले नव्हते. भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाने मालिका 3-1 अशी गमावली. (विराट कोहलीने फिटनेस नियम पाळताना सांगितली आईची चिंता, 'या' कारणामुळे होती नाखूष (Watch Video))

BCCI.tv वर मयंक अग्रवालशी झालेल्या संभाषणादरम्यान कोहलीने आतापर्यंत आपल्या या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या अपयशी टप्प्याचा उल्लेख केला. “2014 माझ्या कारकीर्दीतील एक महत्वपूर्ण टप्पा ठरला. मैलाचा दगड म्हणून बरेच लोक चांगला दौरा लक्षात ठेवतात, पण 2014 चा तो दौरा माझ्या कारकिर्दीतील कायम मैलाचा दगड ठरेल. जिथून मला वाटले की लवकरच गोष्टी माझ्यासाठी खराब होऊ शकतात कारण पुढचा मोठा दौरा ऑस्ट्रेलियाचा होता. मी खाली बसून माझ्या विचार करण्याच्या पद्धतीने आणि खेळाकडे पाहण्याची पद्धत बदलली," कोहली म्हणाला. “जर हा दौरा झाला नसता तर मी जसा होतो तसाच खेळ चालू ठेवला असता. मी सुधारलो नसतो. त्या टूरमुळे मला माझ्या कारकीर्दीत कसे जायचे आहे याचा विचार करण्यास उद्युक्त केले, 'प्रत्येक वेळी कसोटी क्रिकेट खेळताना मला फक्त पुशओव्हर व्हायचं आहे?'."

2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यानंतर सचिन तेंडुलकर आणि रवी शास्त्री यांच्याशी झालेल्या संभाषणामुळे त्याच्यातील त्रुटी दूर करण्यास व त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये त्याला मिळालेले यश संपादन करण्यास मदत मिळाल्याचे कोहली म्हणाला. त्यानंतर 2018 इंग्लंड दौर्‍यावर कोहलीने 5 कसोटी सामन्यात 593 धावा केल्या आणि दोन शतके व 3 अर्धशतक ठोकली. “मी परत आलो आणि मुंबईत सचिन पाजीशी बोललो. मी त्याच्याबरोबर काही सत्रे केली. मी त्याला सांगितले की मी माझ्या हिप पोजीशनवर काम करत आहे पण वेगवान गोलंदाजांविरुद्ध फॉरवर्ड प्रेसही त्याने महत्त्व असल्याचे पटवून दिले.” दुसरीकडे, शास्त्रीने कोहलीला किंचित क्रीझच्या बाहेर फलंदाजी करण्यास सांगितले.

“त्याची समज खूप वेगवान होती. त्याने मला असे काहीतरी सांगितले ज्या नंतर मी सराव करण्यास सुरुवात केली जी क्रीजच्या बाहेर आहे,” कोहली म्हणाला. “त्याने त्यामागील मानसिकता स्पष्ट केली. आपण ज्या जागी खेळत आहात त्या जागेवर आपण नियंत्रण ठेवले पाहिजे आणि गोलंदाजाला तुम्हाला बाहेर काढण्याच्या इतक्या संधी देऊ नयेत. आपण ज्या स्थितीत आहात त्या आपण खरोखर समजू शकता आणि आपण अधिक नियंत्रणात आहात,” तो पुढे म्हणाला.