विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा (Photo Credits: Twitter)

IND vs BAN: टीम इंडिया आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील 2 कसोटी मालिकेतील दुसरा सामना शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळला गेला. दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने बांगलादेशचा तीन गडी राखून पराभव करत मालिका 2-0 अशी खिशात घातली. मीरपूरमध्ये झालेल्या या सामन्यात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि रविचंद्रन अश्विन (R Ashwin) यांनी टीम इंडियाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढत संस्मरणीय विजय मिळवून दिला. टीम इंडियाने चट्टोग्राममध्ये मालिकेतील पहिला सामनाही 188 धावांनी जिंकला आणि आज या विजयासह त्यांनी बांगलादेशचा 2-0 असा क्लीन स्वीप केला. या सामन्यात टीम इंडियाचे आघाडीचे दोन फलंदाज विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा फ्लॉप ठरले पण तरीही या दोघांनी सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

दुसऱ्या कसोटीत विराट कोहली केवळ 25 तर चेतेश्वर पुजाराला दोन्ही डावात केवळ 30 धावा करता आल्या. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली या दोघांची ही 20वी वेळ होती जेव्हा ते टीम इंडियाच्या परदेशात कसोटी विजयात सहभागी झाले होते. तितक्याच सामन्यांमध्ये, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे देखील टीम इंडियाच्या परदेशात कसोटी विजयाचा भाग होते. (हे देखील वाचा: IND vs SL 2023: नव्या वर्षात भारतासमोर श्रीलंकेचे आव्हान, चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील समितीच संघ निवडणार)

टीम इंडियाच्या (परदेशात) सर्वाधिक कसोटी विजयांमध्ये सहभागी झालेले भारतीय खेळाडू

राहुल द्रविड - 24

इशांत शर्मा - 21

विराट कोहली - 20

चेतेश्वर पुजारा - 20

सचिन तेंडुलकर - 20

व्हीव्हीएस लक्ष्मण - 20

टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराने तब्बल 47 महिन्यांनंतर म्हणजेच जवळपास 4 वर्षांनी आपले कसोटी शतक झळकावले. पुजाराने बांगलादेशविरुद्धच्या चट्टोग्राम कसोटीच्या पहिल्या डावात 92 आणि दुसऱ्या डावात नाबाद 102 धावा केल्या. चेतेश्वर पुजाराचीही मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. दुसरीकडे, टीम इंडियाने या विजयासह वर्ष 2022 मध्ये आपला प्रवास संपवला.

आता नवीन वर्षात म्हणजेच 2023 मध्ये टीम इंडिया 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिकेने आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. पुढील वर्षी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामनाही खेळवला जाणार आहे. विराट कोहलीने टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये लय साधली आहे, आता तो कसोटीतील त्याच्या सर्वोत्तम खेळीपैकी एका खेळीची आतुरतेने वाट पाहत आहे.