India National Cricket Team vs Australia National Cricket Team: भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy 2024-25) शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळवला जात आहे. रोहितच्या जागी जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या हाती आहे. दरम्यान भारताने दुसऱ्या डावात विराट कोहली आणि यशस्वी जयस्वालच्या शतकाच्या जोरावर 6 बाद 487 धावा करून डाव घोषित केला. आज यशस्वी जयस्वालने सकाळच्या सत्रात 297 चेंडूत 161 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या या खेळीत 15 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. यशस्वी बाद झाल्यावर विराट कोहलीने भारतीय डावाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. विराट कोहलीच्या शतकाची (Virat Kohli Century) सर्वांनाच प्रतीक्षा होती. त्याने शतक झळकावताच भारतीय ड्रेसिंग रुमने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा - IND vs AUS 1st Test Day 3 Scorecard: पर्थमध्ये विराट कोहलीने झळकावले शतक, टीम इंडियाने डाव केला घोषित; ऑस्ट्रेलियाला दिले 534 धावांचे लक्ष्य)
आजचा दिवस गाजवला तो विराट कोहलीने. विराटने 143 चेंडूत 100 धावांची नाबाद खेळी केली. विराट कोहलीने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकार मारले.टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवत अखेर आपले 81 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले आहे. या शतकासह कोहलीने सुनिल गावसकर यांच्या कोणत्याही एका देशाविरोधातील सर्वाधिक 7 शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
पाहा पोस्ट -
Most Test hundreds in an away country for India
7 - Sunil Gavaskar in West Indies
7 - Virat Kohli in Australia
6 - Rahul Dravid in England
6 - Sachin Tendulkar in Australia#ViratKohli pic.twitter.com/AZKIRFsvnV
— Imran Ahad (@emraanahad) November 24, 2024
विराट कोहलीच्या नावावर आता 81 शतके आहेत. या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 100 शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. या यादीत विराट कोहली 81 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.