IPL मध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांची संपूर्ण यादी पाहा, ‘हा’ वेगवान गोलंदाज नंबर 1 सिंहासनावर विराजमान
मुंबई इंडियन्स-चेन्नई  सुपर किंग्स (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चा दुसरा भाग यूएई (UAE) येथे 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. एकीकडे, या लीगमध्ये पुन्हा फलंदाज अधिकाधिक धावा करण्याचा प्रयत्न करतील, तर गोलंदाजही त्यांच्या संघासाठी जास्तीत जास्त विकेट घेण्याचा प्रयत्न करतील. आयपीएलच्या या हंगामातही प्रत्येक संघाकडे एकापेक्षा एक जबरदस्त गोलंदाज आहेत, जे त्यांच्या संघासाठी खूप चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील आणि जास्तीत जास्त विकेट मिळवतील. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) माजी यॉर्कर किंग लसिथ मलिंगा (Lasith Malinga) आतापर्यंत इंडियन प्रीमियर लीगचा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून निवृत्त झाला. मलिंगाने 122 सामन्यात सर्वाधिक 170 विकेट्स घेतल्या आहेत. आता आपण आयपीएलमधील त्या गोलंदाजांबद्दल बोलूया ज्यांनी संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. (IPL च्या इतिहासात सर्वाधिक ‘या’ संघाने केली शतके, CSK 5 व्या तर KKR शेवटच्या स्थानी)

प्रत्येक आयपीएल संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

इंडियन प्रीमियर लीगच्या आठ फ्रँचायझींच्या विरोधात वेगवेगळ्या गोलंदाजांनी वैयक्तिक सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे, जर एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट घेण्याबाबत विचार केला तर मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा पहिल्या क्रमांकावर आहे. मलिंगाने आयपीएलमध्ये त्यांचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्स विरोधात एकूण 31 विकेट्स घेतल्या होत्या आणि या बाबतीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर, एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत, दोन गोलंदाज संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यामध्ये सुनील नरेनने पंजाबविरुद्ध आतापर्यंत 30 विकेट्स घेतल्या आहेत, तर अमित मिश्राला राजस्थानविरुद्ध 30 विकेट घेण्यात यशस्वी ठरला आहे. तसेच भुवनेश्वर कुमार आणि ड्वेन ब्रावो संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भुवीने केकेआरविरुद्ध आणि ब्रावोने मुंबईविरुद्ध आतापर्यंत 28 विकेट्स घेतल्या आहेत.

याशिवाय आशिष नेहरा, संदीप शर्मा, रवींद्र जडेजा, हरभजन सिंह यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध 23 गडी बाद केले आहेत. दरम्यान ड्वेन ब्रावोने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 19 विकेट्स घेतल्या आहेत.