Team India (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Australia Men's Cricket Team: भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy 2024-25) शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळवला जात आहे. रोहितच्या जागी जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या हाती आहे. त्याआधी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने यजमानांवर आपली पकड घट्ट केली होती. दरम्यान, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. त्याआधी पर्थ कसोटीत तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात विराट कोहलीने शतक झळकावले आहे. आणि यासह टीम इंडियाने डाव घोषित करुन ऑस्ट्रेलियाला 534 धावांचे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने तीन विकेट गमावून 12 धावा केल्या आहे. भारताकडून बुमराहला दोन आणि सिराज 1 विकेट मिळाली आहे.

येथे वाचा संपूर्ण स्कोरकार्ड

पहिल्या डावात भारतीय फलंदाज फ्लाॅप

त्याआधी, पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला. भारताकडून केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करण्यासाठी आले मात्र त्यांना विशेष काही करता आले नाही. तिसऱ्याच षटकात मिचेल स्टार्कने यशस्वी जैस्वालच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला. जैस्वाला खातेही उघडता आले नाही. यानंतर देवदत्त पडिक्कलही शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहलीही काही विशेष करू शकला नाही आणि केवळ 5 धावा करून जोश हेझलवूडचा बळी ठरला. या वेळी केएल राहुलने एक टोक धरले आणि हळूहळू संघाच्या खात्यात धावांची भर घातली पण तोही 26 धावा करुन बाद झाला.

जोश हेझलवूडने घेतल्या 4 विकेट

त्यानंतर मिचेल मार्शने ध्रुव जुरेल (11) आणि वॉशिंग्टन सुंदर (4) यांना आपला बळी बनवले. 37 धावा करू शकणाऱ्या पॅट कमिन्सने पंतची मौल्यवान विकेट घेतली. यानंतर हर्षित राणा 7 धावा करून बाद झाला तर कर्णधार जसप्रीत बुमराह 8 धावा करून बाद झाला. भारताला शेवटचा धक्का नितीशच्या रूपाने बसला. नितीश 41 धावा करुन बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने 4 विकेट घेतल्या. तसेच, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि मिचेल मार्श यांनी 2-2 विकेट घेतल्या.

बुमराहने घेतल्या पाच विकेट

त्यानंतर प्रत्युत्तरात पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या दिवशी 104 धावांवर गारद झाला. त्यामुळे भारताने 46 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने 14 च्या स्कोअरवर मॅकस्वीनीच्या रूपात पहिली विकेट गमावली. बुमराहने 19 धावांवर ख्वाजाला आपला दुसरा बळी बनवला, पुढच्याच चेंडूवर स्टीव्ह स्मिथही एलबीडब्ल्यू झाला. यानंतर हर्षित राणाने ट्रॅव्हिस हेडला 31 धावांवर बाद करत भारताला चौथे यश मिळवून दिले. मोहम्मद सिराजने मिचेल मार्शला बाद केले. त्यानंतर सिराजने मार्नस लॅबुशेनला बाद करून ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का दिला. बुमराहने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला झेलबाद केले. आणि त्यानंतर कांगारुनी विकेट फेकल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. तर हर्षित राणाने 3 आणि सिराजने 2 विकेट घेतल्या.

जैस्वाल आणि विराट कोहलीचे शतक

दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने 487 धावांवर आपला डाव घोषित केला. आणि आघाडी घेत ऑस्ट्रेलियाला 534 धावांचे लक्ष्य दिले. कोहली व्यतिरिक्त, यशस्वी जैस्वालने भारतासाठी शतक झळकावत 161 धावांची शानदार खेळी खेळली, तर केएल राहुलने 77 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटी जिंकल्यास इतिहास रचला जाईल. वास्तविक, कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च लक्ष्याचा पाठलाग 418 धावांचा आहे. आजपर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 500 किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य मिळालेले नाही.