अबब! IPL च्या इतिहासात 5 गोलंदाजांची सर्वाधिक धुलाई, आकडेवारी पाहून डोळे चक्रावतील; यादीत No. 1 बॉलर आहे चॅम्पियन संघाच्या ताफ्यात
इशांत शर्मा (Photo Credit: Instagram)

T20 क्रिकेटमध्ये अनेकदा गोलंदाजांची धुलाई होतेच. फलंदाज आकर्षक फटके खेळून गोलंदाजांची लाईन आणि लेन्थ खराब करतात व धावांचा डोंगर उभारतात. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 सुरू होणार आहे आणि पुन्हा एकदा गोलंदाज काही फलंदाजांपासून नक्कीच सावध असतील. कारण जर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही, तर फलंदाजांवर दबाव वाढतो आणि सोबत त्यांचा पराभव निश्चित असतो. आयपीएलच्या (IPL) इतिहासात आतापर्यंत अनेक संघांनी मोठी धावसंख्येचा डोंगर उभारला आहे आणि ते पण विरोधी गोलंदाजांच्या कमजोरीचा फायदा घेऊन. आयपीएल इतिहासात सर्वात महागडे ठरलेल्या पहिल्या पाच गोलंदाजांची यादी खालीलप्रमाणे आहेत. (IPL 2022 मध्ये ‘हे’ युवा स्टार्स पदार्पण करण्यासाठी सज्ज, ‘बेबी AB’ ते विश्वविजेता कर्णधार दाखवणार जलवा)

1. बेसिल थंपी (Basil Thampi)

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकणारा गोलंदाज बेसिल थंपी आहे. 2018 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या या गोलंदाजाने आरसीबीविरुद्ध 4 षटकात 70 धावा लुटल्या होत्या. बासिल आपल्या चार षटकांत 6 षटकार आणि 5 चौकार दिले. विशेष म्हणजत थंपीला यावेळी आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने 30 लाखाच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे.

2. मुजीब उर रहमान (Mujeeb ur Rahman)

अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू आयपीएलमधील दुसरा सर्वात महागडा गोलंदाज आहे. मुजीब मिस्ट्री गोलंदाजीसाठी ओळखला जातो पण 2019 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना सनरायझर्स हैदराबाद फलंदाजांनी त्याची जोरदार धुलाई केली. मुजीबने 4 षटकात 66 धावा दिल्या. म्हणजे त्याचा इकॉनॉमी रेट 16.5 होता.

3. इशांत शर्मा (Ishant Sharma)

इशांत शर्मा आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वात महागडा गोलंदाज आहे. 2013 मध्ये हैदराबादकडून खेळणाऱ्या शर्मानेही 4 षटकात 66 धावा दिल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्जने इशांतच्या चार षटकांत 66 धावा लुटल्या.

4. उमेश यादव (Umesh Yadav)

2013 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून गोलंदाजी केलेल्या उमेश यादवने आरसीबीविरुद्ध 4 षटकात 65 धावा दिल्या. विराट कोहलीने 18व्या षटकात यादवला धुधू धुतलं आणि एका षटकात 24 धावा काढल्या.

5. संदीप शर्मा (Sandeep Sharma)

2014 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळलेल्या संदीप यानेही 4 षटकात 65 धावा दिल्या. सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी संदीपचा जोरदार समाचार घेतला. संदीपच्या षटकात शिखर धवनने 4 चौकार आणि 1 षटकार लगावला.