WPL 2025: महिला प्रीमियर लीग 2025 हंगाम (WPL 2025) 14 फेब्रुवारीपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे. ही स्पर्धेची तिसरी आवृत्ती असेल. ज्यामध्ये पाच संघ प्रतिष्ठित जेतेपदासाठी भिडतील. तर ही स्पर्धा 15 मार्चपर्यंत खेळवली जाणार आहे. यावेळी स्पर्धेचे सामने चार वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत, ज्यामुळे स्पर्धेत उत्साहाची एक नवीन पातळी वाढेल. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली, बंगळुरूने गेल्या वर्षी अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर आठ विकेट्सने विजय मिळवून महिला प्रीमियर लीगचे पहिले विजेतेपद जिंकून इतिहास रचला. अशा परिस्थितीत, गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) त्यांचे जेतेपद राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. महिला प्रीमियर लीग 2025 चे संपूर्ण वेळापत्रक, लाईव्ह स्ट्रीमिंग आणि संपूर्ण संघ येथे पाहा...

प्रत्येक संघ प्रत्येक संघासोबत दोनदा सामने खेळणार

2025 च्या हंगामात 20 ग्रुप-स्टेज सामने खेळवले जातील. ज्यामध्ये प्रत्येक संघ प्रत्येक संघासोबत दोनदा सामने खेळेल. पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेला संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेले संघ एलिमिनेटरमध्ये खेळतील. या सामन्यात जिंकणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. (हे देखील वाचा: WPL 2025 UP Warriorz: महिला प्रीमियर लीगपूर्वी, यूपीने कर्णधार बदलला, या अनुभवी खेळाडूला मिळाली जबाबदारी)

येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

महिला प्रीमियर लीग 2025 टीव्ही आणि ओटीटीवर कुठे पाहणार?

महिला प्रीमियर लीग 2025 चे भारतात स्पोर्ट्स18 नेटवर्कद्वारे थेट प्रक्षेपण केले जाईल. तर लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

महिला प्रीमियर लीग 2025 चे संपूर्ण संघ

गुजरात जायंट्स (Gujarat Giants)

अ‍ॅशले गार्डनर (कर्णधार), हरलीन देओल, प्रकाशिका नाईक, बेथ मुनी, काशवी गौतम, प्रिया मिश्रा, भारती फुलमाली, लॉरा वोल्वार्ड, सायली सचरे, डॅनियल गिब्सन, मन्नत कश्यप, शबनम शकील, दयालन हेमलता, मेघना सिंग, सिमरन शेख, डिएंड्रा डॉटिन, फोबी लिचफिल्ड, तनुजा कंवर.

gujarat giants (Photo - X)
Gujarat Giants (Photo - X)

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)

अ‍ॅलिस कॅप्सी, मेग लॅनिंग, सारा ब्राइस, अ‍ॅनाबेल सदरलँड, मिन्नू मणी, शफाली वर्मा, अरुंधती रेड्डी, एन चरणी, शिखा पांडे, जेमिमा रॉड्रिग्ज, नंदिनी कश्यप, स्नेहा दीप्ती, जेस जोनासेन, निकी प्रसाद, तानिया भाटिया, मार्चिझान कॅप, राधा यादव, तितास साधू

Delhi Capitals Womens (Photo Credit - X)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore)

आशा शोभना जॉय, जोशिता व्हीजे, रिचा घोष, डॅनी व्याट, कनिका आहुजा, सब्बिनेनी मेघना, एकता बिश्त, केट क्रॉस, श्रेयंका पाटील, एलिस पेरी, प्रेमा रावत, स्मृती मानधना, जॉर्जिया वेअरहॅम, राघवी बिस्ट, सोफी डेव्हाईन, जगरवी पवार, रेणुका सिंग, सोफी मोलिनेक्स.

RCB WIN WPL (Photo Credit - X)
RCB WIN WPL (Photo Credit - X)

यूपी वॉरियर्स (UP Warriors)

अलाना किंग, गौहर सुलताना, साईमा ठाकोर, एलिसा हीली, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, अंजली सरवानी, किरण नवगिरे, सोफी एक्लेस्टोन, आरुषी गोयल, क्रांती गौर, ताहलिया मॅकग्रा, चामारी अथापथू, पूनम खेमनार, उमा छेत्री, दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, वृंदा दिनेश

UP Warriors
UP Warriors (Photo Credit - X)

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)

अक्षिता माहेश्वरी, हरमनप्रीत कौर, पूजा वस्त्राकर, अमनदीप कौर, हेली मॅथ्यूज, साईका इशाक, अमनजोत कौर, जिंतीमणी कलिता, सजीवन सजना, अमेलिया केर. कीर्तन बालकृष्णन, संस्कृती गुप्ता, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लार्क, शबनीम इस्माइल, जी कमलिनी, नताली सायव्हर-ब्रंट, यास्तिका भाटिया

WPL Mumbai Indians (Photo Credit - Twitter)
WPL Mumbai Indians (Photo Credit - Twitter)