
Scotland National Cricket Team vs Australia National Cricket Team: स्कॉटलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (Scotland National Cricket Team) विरुद्ध ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (Australia National Cricket Team) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज एडिनबर्ग येथील ग्रँज क्रिकेट क्लब येथे संध्याकाळी 6.30 वाजता खेळवला जाईल. दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा 70 धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. स्कॉटलंडची कमान रिची बेरिंग्टन यांच्या खांद्यावर आहे. तर मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना दिसत आहे. दोन्ही देशांदरम्यान पहिल्यांदाच द्विपक्षीय मालिका खेळवली जात आहे.
ऑस्ट्रेलियाचा मालिकेवर कब्जा
पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा सात गडी राखून तर दुसऱ्या सामन्यात 70 धावांनी पराभव केला. आता मालिकेतील तिसरा टी-20 सामना खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियन संघ मालिकेवर कब्जा करू इच्छितो. दुसरीकडे, स्कॉटलंड संघ आपल्या खेळाची पातळी सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.
कधी अन् कुठे पाहणार सामना?
ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यातील तिसरा टी-20 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. तर नाणेफेक संध्याकाळी 6.00 वाजता होईल. तसेच, दोन्ही संघामधील सामना भारतात प्रसारित होणार नाही. त्यामुळे चाहत्यानां हा सामना फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर थेट पाहता येइल. (हे देखील वाचा: AFG vs NZ Test: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, 'या' खेळाडूंना मिळाली संधी)
हेड टू हेड रेकॉर्ड
आतापर्यंत स्कॉटलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा होता. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत ऑस्ट्रेलियन संघाने तिन्ही सामने जिंकले आहेत. आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा 5 गडी राखून पराभव केला. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने विजयासाठी 181 धावांचे लक्ष्य सहज गाठले होते. सध्याच्या मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय नोंदवला होता.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
स्कॉटलंड: जॉर्ज मुन्से, ऑली हेयर्स, ब्रँडन मॅकमुलेन, रिची बेरिंग्टन (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस (विकेटकीपर), मायकेल लीस्क, मार्क वॅट, जॅक जार्विस, चार्ली कॅसल, जॅस्पर डेव्हिडसन, ब्रॅड व्हील.
ऑस्ट्रेलियाः ट्रॅव्हिस हेड, जेक फ्रेझर-मॅकगर्क, मिचेल मार्श (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, शॉन ॲबॉट, झेवियर बार्टलेट, ॲडम झाम्पा आणि रिले मेरेडिथ.