कोरोना विषाणूमुळे या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर (T20 World Cup 2020) टांगती तलवार आहे. विश्वचषकाचे भवितव्य ठरवण्यासाठी आतंराष्ट्रीय क्रिकेट परिषेद आणि संलग्न संघटना यांच्यात आज तब्बल 5 तास चर्चा झाली आहे. या बैठकीत वर्ल्ड कपवर असलेली संकट दुर करुन वर्ल्ड कपचे आयोजन होईल, अशी शक्यता होती. मात्र, आयसीसीच्या बैठकीत टी-20 विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आयसीसीने स्पर्धेच्या आयोजनाबद्दलचा निर्णय जुलै महिन्यापर्यंत पुढे ढकलला आहे. दरम्यानच्या काळात पुरुष टी-20 विश्वचषक 2020 आणि महिला क्रिकेट विश्वचषक 2021 च्या आयोजनासाठी काही पर्याय उपलब्ध होतात का याबद्दल आयसीसी विचार करणार आहे. तसेच ही स्पर्धा स्थगित झाल्यास त्या जागी बीसीसीआय आयपीएल खेळवण्याचा विचार करत आहे. त्यामुळे ही बैठक आयपीएलच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाची होती. पण या बैठकीत पुन्हा एकाद आयसीसीने वेट ऍन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. ऑस्ट्रेलियन सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकाचे आयोजन ,करण्यात आले होते. त्यामुळे इतक्या कमी कालावधीत टी-20 विश्वचषकासारखी स्पर्धा आयोजित करण्याबद्दल अनेक बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम होता. परंतू, करोनामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक घटकाच्या सुरक्षेचा विचार करुन नवीन पर्याय शोधण्यावर आयसीसी बैठकीत एकमत झाले आहे. हे देखील वाचा- New ICC Rules: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये होणार मोठे बदल; महत्वाच्या 'या' 4 नियमांना मंजूरी

आयसीसीचे ट्वीट-

कोरोनानंतर क्रिकेट सुरु करायचे झाल्यास खबरदारीचे उपाय घ्यावे लागणार आहेत. कारण, कोरोना विषाणूमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णपण ठप्प झाले आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये एकही आंतरराष्ट्रीय स्पर्धा झालेली नाही. आता करोना विषाणूचा जोर थोडा कमी झाल्याचे पाहून पुन्हा एकदा क्रिकेट पूर्वपदावर येण्यासाठी सज्ज होत आहे. पण जर यावेळी सुरक्षिततेचे उपाय घेतले गेले नाहीत, तर क्रिकेट पुन्हा बंद करावे लागू शकते. यामुळे आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महत्वाचे 4 बदल करण्यात येणार आहेत.