टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल (KL Rahul) बऱ्याच दिवसांपासून त्याच्या खराब फॉर्मशी झगडत आहे. दिल्ली कसोटीनंतर त्याचा खराब फॉर्म पाहता बीसीसीआयने (BCCI) त्याला संघाच्या उपकर्णधारपदावरून हटवले आहे. त्याच वेळी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध (IND vs AUS Test Series) बीसीसीआयने उर्वरित दोन कसोटींसाठी देखील संघ जाहीर केला आहे. मात्र त्यांनी उपकर्णधारपदासाठी कोणाचीही निवड केलेली नाही. त्याची जबाबदारी कर्णधार रोहित शर्मावर (Rohit Sharma) सोपवण्यात आली आहे. हे तीन खेळाडू या शर्यतीत आघाडीवर आहेत. तसेच कर्णधार रोहित शर्मा लवकरच हा निर्णय घेवु शकतो. (हे देखील वाचा: KL Rahul चा सतत फ्लॉप शो असूनही संघ व्यवस्थापनाचा त्याच्यावर विश्वास, तर रोहितने पांठिबा देत मांडली बाजू)
चेतेश्वर पुजारा
स्टार कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारालाही रोहित शर्माला उपकर्णधार बनवलं जाऊ शकतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये त्याने तीन डावात केवळ 38 धावा केल्या असतील, पण त्याच्याकडे अनुभवाची कमतरता नाही आणि जबाबदारी चांगल्या प्रकारे हाताळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.
आर अश्विन
संघाचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन या यादीत उपकर्णधार होण्यासाठी प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. त्याने आतापर्यंत दोन सामन्यांत 14 बळी घेतले आहेत. यासोबतच त्याच्याकडे कसोटी क्रिकेटचाही भरपूर अनुभव आहे आणि कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमताही त्याच्याकडे आहे. अश्विन त्याच्या चेंडूसोबतच फलंदाजीनेही संघाला साथ देऊ शकतो.
रवींद्र जडेजा
स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा हाही उपकर्णधारपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिला जात आहे. त्याने आतापर्यंत दोन कसोटीत 17 बळी घेतले आहेत. यासोबतच गोलंदाजीसोबतच जडेजा फलंदाजीनेही सामन्याचा मार्ग बदलू शकतो. त्याचबरोबर जडेजाकडेही अनुभव आहे आणि तो या जबाबदारीसाठी सक्षम खेळाडूही आहे.
श्रेयस अय्यरचेही नाव समोर
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा लवकरच संघासाठी नवीन उपकर्णधार निवडणार आहे. दुसरीकडे, चेतेश्वर पुजारा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा हे तीन तेजस्वी खेळाडू उपकर्णधारासारख्या मोठ्या जबाबदारीच्या या शर्यतीत आघाडीवर आहेत. त्याचबरोबर या तीनपैकी कोणत्याही एका खेळाडूला ही मोठी जबाबदारी मिळू शकते. मात्र, या तीन खेळाडूंनंतर श्रेयस अय्यरचेही नाव समोर आले आहे. त्याची कसोटीतील आकडेवारी प्रभावी आहे आणि त्याला उपकर्णधारही बनवले जाऊ शकते.