Photo Credit- X

Tennis Ball Cricket Premier League 2025: माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगची टी 10 टेनिस बॉल लीगच्या पहिल्या आवृत्तीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीगने (Tennis Ball Cricket Premier League) आठ भारतीय शहरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघांसह लीगची घोषणा केली. ही स्पर्धा 26 मे ते 5 जून दरम्यान यूएईमध्ये खेळवली जाईल आणि सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केली जाईल. या स्पर्धेत लीग सामने असतील, त्यानंतर चार प्लेऑफ सामने होतील. (IND vs ENG T20I And ODI Series Schedule: भारत आणि इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून खेळवली जाणार टी-20 आणि वनडे मालिका, नोट करुन घ्या सामन्याची तारीख आणि वेळ)

युवराज सिंग

खेळाडूंचा लिलाव

टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीगसाठी 5 आणि 6 मे रोजी खेळाडूंचा लिलाव होईल. लीगसाठी 50 भारतीय शहरांमध्ये चाचण्या देखील होतील. मुंबई मॅव्हेरिक्स, दिल्ली डायनॅमोस, बंगळुरू ब्लास्टर्स, कोलकाता किंग्ज, चंदीगड चॅम्पियन्स, हैदराबाद हंटर्स, अहमदाबाद अवेंजर्स आणि चेन्नई चॅलेंजर्स हे संघ खेळत आहेत. (Melbourne Stars vs Sydney Sixers BBL 2025 Live Streaming: मेलबर्न स्टार्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या)

सामने कुठे प्रसारित केले जातील

टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीगचे सामने केवळ सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केली जाईल. या रोमांचक स्पर्धेचे ठिकाण लवकरच जाहीर केले जाणार आहे.

ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त झाल्यानंतर युवराज या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असल्याचे म्हणाला, "क्रिकेटमधील या ऐतिहासिक क्षणाचा भाग होण्याचा मला खूप आनंद आहे. टीबीसीपीएल 10 ही भारतातील अनेक शहरांमधून व्यावसायिक टेनिस बॉल क्रिकेट प्रतिभेला एकत्र आणणारी पहिली स्पर्धा आहे. आता, आम्ही हे स्वरूप अनेक शहरांमध्ये व्यावसायिकरित्या घेण्यास उत्सुक आहोत."