Toxic Movie Teaser Release : कन्नड सुपरस्टार अभिनेता यशने वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी भेट दिली असून त्याच्या आगामी 'टॉक्सिक' चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज करण्यात आला.यशचा 8 जानेवारी रोजी वाढदिवस असल्यामुळे या निमित्ताने त्याच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला अआहे. 'टॉक्सिक'च्या फर्स्ट लूकमध्ये यशचा गँगस्टर लूक पाहायला मिळत आहे. सूट-बूट, डोक्यावर टोपी, गळ्यात चैन आणि तोंडात सिगार असा यशचा डॅशिंग लूक समोर आला आहे. (हेही वाचा - Actor Ajith Kumar Race Car Accident: सुपरस्टार अजित कुमारच्या गाडीचा रेसिंग ट्रॅकवर अपघात; पहा व्हिडिओ )
पाहा पोस्ट -
View this post on Instagram
यशच्या केजीएफ आणि केजीएफ 2 चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. यानंतर आता रॉकिंग स्टार यश पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज झाला आहे. यशच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'टॉक्सिक' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. 'टॉक्सिक' चित्रपटातील यशचा फर्स्ट लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.
यशच्या 'टॉक्सिक : अ फेयरीटेल फॉर ग्रोन अप्स' या चित्रपटासह बॉक्स ऑफिसवर धडकण्यास तयार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी बुधवारी यशच्या वाढदिवसानिमित्त टॉक्सिक चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी केला आहे. टॉक्सिक चित्रपटाचा छोटासा टीझर रिलीज करण्यात आला आहे. गीतू मोहनदास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
'टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन अप्स' चित्रपटाचा एका मिनिटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटातील त्याचा लूक पाहून चाहते खूश झाले आहेत. यावरुन यश अंडरवर्ल्ड गँगस्टरची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.