Photo- X/@mittal68218

Sikar Accident Video: राजस्थानमधील सीकरचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यात थार कारने कोचिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला धडक दिली आणि नंतर विजेचा खांब तोडला. मिळालेल्या माहितीनुसार, उद्योग नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला असून यामध्ये अंकित या विद्यार्थ्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. अपघातानंतर घाबरलेल्या चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र  नियंत्रण सुटले आणि गाडी विजेच्या खांबावर आदळल्याने खांब तुटला आणि परिसरातील वीजपुरवठा सुमारे ८ तास विस्कळीत झाला. ही घटना सीसीटीव्हीकॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, भरधाव वेगाने येणाऱ्या थार कारने पायी चालणाऱ्या विद्यार्थ्याला धडक दिली.

भरधाव थारने विद्यार्थ्याला धडक दिली

ही घटना सीसीटीव्हीकॅमेऱ्यात कैद 

अपघातानंतर जवळच उभ्या असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी तात्काळ अंकितला उचलून सुरक्षित स्थळी नेले. दरम्यान, थार चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडी विजेच्या खांबावर आदळली. विजेचा खांब तुटल्यानंतर संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे सुमारे ८ तास वीज पुरवठा खंडित झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले, अशी माहिती वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पोलीस तपास करत आहेत.

घटनेनंतर कोचिंग डायरेक्टरने उद्योगनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि वाहन क्रमांकाच्या आधारे वाहन आणि चालकाचा शोध सुरू केला आहे. आरोपींना लवकरच पकडण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

स्थानिकांमध्ये नाराजी

या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये नाराजी आहे. अशा वेगाने आणि निष्काळजी वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात यावी, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.