Sir Ratan Tata Industrial Institute (SRTII) च्या बोर्ड ऑफ ट्रस्टी मध्ये Tata Trusts चे चेअरमन Noel Tata, च्या मुली Leah अणि Maya Tata यांचा समावेश झाला आहे. आता रतन टाटा यांच्या निधनानंतर ही घडामोड समोर आली आहे. टाटा कुटुंबातील नवी पिढी आता सक्रिय होत आहे. यामध्ये Leah 39 वर्षीय आहे तर Maya 36 वर्षांची आहे. नोएल टाटा यांच्यासोबत आता त्यांच्या लेकी देखील सहभागी होणार आहेत.
Leah Tata आणि Maya Tata कोण आहेत?
Leah Tata या Indian Hotels Company Limited च्या व्हाईस प्रेसिडंट आहेत. IHCL हा टाटा ग्रुपचा हॉस्पिलिटीचा एक भाग आहे. Leah Tata या IE Business School मधून पदवीधर झाल्या आहेत. 2006 मध्ये त्यांनी आपलं करियर assistant sales manager म्हणून Taj Hotels मध्ये सुरू केले. नंतर त्या Louis Vuitton मध्ये इं टर्न होत्या. Leah यांनी टाटा हॉस्पिटॅलिटी मध्ये काम करण्यास सुरूवात केली आणि कामाचा ढोलारा वाढवला आहे. Noel Tata यांची एकमताने Chairman of Tata Trusts म्हणून निवड झाली. नोएल टाटा यांची दुसरी लेक माया टाटा यांनी Bayes Business School and Warwick University मधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. Tata Opportunities Fund मधून त्यांनी कामाला सुरूवात केली. आता त्या Tata Digital मध्ये काम करतात. त्यांनीच Tata Neu app, लॉन्च करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
SRTII मधील त्यांची भूमिका आणि वाद
Leah आणि Maya यांची Sir Ratan Tata Trust trustees मध्ये बिनविरोध निवड झाली आहे. त्यांनी SRTII मध्येही प्रवेश मिळवला आहे. त्यांनी Arnaz Kotwal आणि Freddy Talati यांची जागा घेतली आहे. त्या दोघींच्या नेमणूकीवर आता Kotwal यांनी टीका केली आहे. Financial Express च्या रिपोर्ट्सनुसार, त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 1928 मध्ये स्थापन झालेली, SRTII टाटा भगिनींशी जवळून काम करत होती. आता टाटा कुटुंबातील पुढील पिढीच्या खांद्यावर सामाजिक सेवा आणि कामाचा व्याप सांभाळण्याची मोठी जबाबदारी आहे.