IND vs WI: भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम (WTC Final 2023) सामन्यात 209 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. आता वेस्ट इंडिज दौऱ्याने टीम इंडियाने (Team India) नव्याने सुरुवात करायला हवी. या दौऱ्यात टीम इंडियाला 5 टी-20 सामनेही खेळायचे आहेत. टीमची कमान हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) असणार असल्याचं वृत्त आहे. अशा परिस्थितीत या दौऱ्यावर काही युवा खेळाडू पुन्हा एकदा खेळताना दिसतील. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला टीम इंडियाच्या संभाव्य संघाविषयी सांगणार आहोत.
नवी सलामी जोडी उतरेल मैदानात
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघात चार सलामीवीरांचा समावेश केला जाऊ शकतो. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन यांना या दौऱ्यात संधी दिली जाऊ शकते. यापैकी कोणतेही दोन खेळाडू टीम इंडियासाठी डावाची सुरुवात करताना दिसू शकतात. (हे देखील वाचा: Indian Test Captain: रोहित शर्माच्या जागी 'हे' अनुभवी खेळाडू आहे कसोटी कर्णधारपदाचे दावेदार, पाहा यादीत कोणाचा आहे समावेश)
मधल्या फळीत अनेक स्टार खेळाडू
त्याचबरोबर या दौऱ्यात मधल्या फळीत काही महान खेळाडूंचाही समावेश केला जाऊ शकतो. सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा आणि नेहल वढेरा यांची संघात निवड होऊ शकते. त्याचबरोबर या खेळाडूंना कर्णधार हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांची साथ मिळेल. रवींद्र जडेजाला विश्रांती दिली जाते की त्याचा समावेश होणार की नाही हे पाहणे विशेष ठरणार आहे.
गोलंदाजीतही अनेक बदल होण्याची शक्यता
फिरकीपटू रवी बिश्नोई आणि युझवेंद्र चहलसह वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि आकाश मधवाल यांचा संघात समावेश केला जाऊ शकतो. आयपीएलमध्ये या खेळाडूंची कामगिरी अप्रतिम होती.
भारतीचा संभाव्य टी-20 संघ:
शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, जितेश शर्मा, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, आकाश मधवाल