South Africa National Cricket Team vs India National Cricket Team, 4th T20I Match: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ, चार सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना 15 नोव्हेंबर रोजी खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना जोहान्सबर्गच्या वाँडरर्स स्टेडियमवर खेळला गेला. चौथ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 135 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिका 3-1 अशी खिशात घातली आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या खांद्यावर होती. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे होती. यासह टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 सामन्यांची मालिका 3-1 ने जिंकली. यावर्षी टीम इंडियाची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी प्रभावी ठरली आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकण्यासोबतच या संघाने या वर्षी केवळ 2 सामने गमावले आहेत. टीम इंडियाची आकडेवारी पाहू.
टीम इंडियाची 2024 सालातील 'अशी' आहे कामगिरी
या वर्षी टीम इंडियाने आतापर्यंत एकूण 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 24 सामने जिंकले आहेत, तर केवळ 2 सामने गमावले आहेत. त्याच वेळी, 2 सामने टाय झाले, जे नंतर टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये जिंकले. या वर्षी टीम इंडियाने अफगाणिस्तानचा 3-0, झिम्बाब्वेचा 4-1, श्रीलंकेचा 3-0, बांगलादेशचा 3-0 आणि दक्षिण आफ्रिकेचा 3-1 असा पराभव केला. संघाने आयसीसी टी-20 विश्वचषकातील सर्व 8 सामने जिंकले. तोपर्यंत संघाची कमान रोहित शर्माच्या हाती होती. (हे देखील वाचा: West Indies vs England 4th T20I 2024 Live Streaming: चौथ्या टी-20 मध्ये इंग्लंडला कडवी टक्कर देण्यासाठी वेस्ट इंडिज उतरणार मैदानात, इथे जाणून घ्या भारतात थेट सामन्याचा कधी अन् कुठे घेणार आनंद)
टीम इंडियाने 2024 मध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकला
आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत दुसरे विजेतेपद पटकावले. 2007 मध्ये पहिल्यांदाच टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली हे विजेतेपद पटकावले होते. 2013 नंतर प्रथमच टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश आले. टी-20 विश्वचषक विजेतेपद पटकावल्यानंतर विराट कोहली, रोहित आणि रवींद्र जडेजा सारख्या दिग्गजांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.
'या' फलंदाजांनी केल्या आहेत सर्वाधिक धावा
यावर्षी संजू सॅमसनने टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. सन 2024 मध्ये, संजू सॅमसनने 13 सामन्यांच्या 12 डावांमध्ये 180.16 च्या स्ट्राइक रेटने आणि 43.60 च्या सरासरीने 436 धावा केल्या आहेत. या वर्षात संजू सॅमसनने 3 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. एका वर्षात 3 टी-20 आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारा संजू सॅमसन हा पहिला फलंदाज आहे. या यादीत संजू सॅमसननंतर सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्यकुमार यादवने 18 सामन्यात 151.59 च्या स्ट्राईक रेटने 429 धावा केल्या आहेत.
'या' गोलंदाजांनी घेतल्या आहेत सर्वाधिक विकेट
टीम इंडियाचा युवा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगने यावर्षी 18 सामने खेळले आहेत. त्याने 18 डावात 13.50 च्या सरासरीने 36 विकेट घेतल्या आहेत. अर्शदीप सिंगने एकदाच 4 विकेट घेतल्या आहेत. या काळात अर्शदीप सिंगची सर्वोत्तम कामगिरी 4/9 अशी आहे. अर्शदीप सिंगचा इकॉनॉमी रेट 7.49 होता. अर्शदीप सिंगनंतर रवी बिश्नोईने 16 सामन्यांच्या 16 डावात 20.86 च्या सरासरीने 22 बळी घेतले आहेत. रवी बिश्नोईने एकदाच 4 विकेट घेतल्या आहेत.
टीम इंडियाने नावावर केले 'हे' खास विक्रम
टीम इंडियाच्या फलंदाजांनी या वर्षात 7 शतके झळकावली आहेत. तिळक वर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग 2 सामन्यात शतके ठोकली. संजू सॅमसनने 3 शतके, रोहित शर्माने 1 शतक आणि अभिषेक शर्माने 1 शतक झळकावले. या वर्षात टीम इंडियाने 9 वेळा 200 किंवा त्याहून अधिक टीम स्कोअर केला आहे. या वर्षी टीम इंडियाने जोहान्सबर्गमध्ये 23 षटकार ठोकले. पूर्ण सदस्य संघांमध्ये टी-20 डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा हा विक्रम आहे.
शेवटच्या सामन्यात भारताचा 135 धावांनी विजय
चौथ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत एक विकेट गमावून 283 धावा केल्या. टीम इंडियासाठी तिलक वर्माने सर्वाधिक 120 नाबाद धावांची स्फोटक खेळी खेळली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 10 धावांवर संघाचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 18.2 षटकांत अवघ्या 148 धावांत गारद झाला.