भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना 26 डिसेंबर (मंगळवार) 2023 पासून सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन येथे खेळवला जाईल. IND vs SA पहिली कसोटी भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू होणार होती. पण आता ओल्या खेळपट्टीमुळे नाणेफेकीला उशीर होणार आहे. दुपारी 1:30 वाजता खेळपट्टीची पाहणी करण्यात आली, त्यानंतर पंचांनी नाणेफेक 01:45 वाजता घेण्याचा निर्णय घेतला, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेकडून दोन खेळाडू पदार्पण करत आहेत. प्रसिद्ध कृष्णानेही टीम इंडियासाठी पदार्पण केले आहे. त्यानंतर 02:00 वाजता खेळ सुरू झाला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला पहिला धक्का बसला, कागिसो रबाडाने रोहित शर्माला अवघ्या 5 धावांवर बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)