IPL Mega Auction (photo Credit - X)

TATA IPL 2025 Mega Auction LIVE:  इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी खेळाडूंचा लिलावाला (IPL 2025 Mega Auction) सुरुवात झाली आहे. हा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया येथे पार पडत आहे. या मेगा लिलावात एकूण 577 खेळाडू आपले नशीब आजमावतील, त्यापैकी 367 भारतीय आणि 210 परदेशी खेळाडू आहेत. या मेगा लिलावात, सर्व 10 संघ एकूण 204 खेळाडूंवर बोली लावू शकतील, त्यापैकी जास्तीत जास्त 70 परदेशी आहेत.

ऋषभ पंत हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. पंतला लखनऊने 27 कोटींना विकत घेतले आहे. ऋषभ पंत या हंगामातीलच नव्हे तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले आणि तो आयपीएलमधील दुसरा सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू ठरला. या यादीत तिसरे नाव हे व्यंकटेश अय्यरचे लागले केकेआरने त्याला 23.75 कोटी रुपयांना विकत घेतले.

पाहा कोणत्या खेळाडूला किती पैसे मिळाले

दरम्यान एलएसजीचा कर्णधार असलेला केएल राहुल यावेळी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. या मोसमात आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत ठरला आहे. संघांनी 12 खेळाडूंवर 180.5 कोटी रुपये खर्च केले आहेत. दरम्यान यंदाच्या आयपीलच्या लिलावात सर्वच खेळाडूंवर जास्च पैशांची लूट होताना दिसत असून यंदा सर्व खेेळाडूंना प्रत्येक सामन्याचे देखील पैसे मिळणार आहेत.