भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) तडाखेबाज अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) दुखापतीबाबत संघ व्यवस्थापनाने वक्तव्य केले आहे. रविवारी पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध टी-20 विश्वचषकच्या सलमाच्या सामन्यात फलंदाजी करताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले. हार्दिकची दुखापत गंभीर नसल्याचे असल्याचे समजले जात आहे. आणि 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सामन्यात तो उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध हार्दिक 8 चेंडूत 11 धावा करून बाद झाला आणि यादरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. यानंतर पाकिस्तान दावादरम्यान हार्दिक मैदानात उतरताही नाही. हार्दिक सध्या या टी-20 विश्वचषकात फिनिशर म्हणून खेळत आहे, तो फक्त फलंदाजी करत असून सध्या गोलंदाजी करू शकणार नाही. (Hardik Pandya Injury: हार्दिक पांड्याने पुन्हा वाढवले टीम इंडिया टेंशन, खांद्याला दुखापत झाल्यामुळे स्कॅनसाठी नेण्यात आले)
पांड्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्यापासून तो सातत्यपूर्ण गोलंदाजी करू शकलेला नाही आणि अशा परिस्थितीत संघाला त्याच्यातील अष्टपैलू खेळाडूची उणीव भासत आहे. पांड्याने पाकिस्तानविरुद्ध सामन्यापूर्वी सांगितले होते की, तो स्पर्धेच्या शेवटच्या भागात गोलंदाजी करताना दिसू शकतो. तसेच कर्णधार विराट कोहली म्हणाला होता की, हार्दिक पांड्या सामन्यात एक किंवा दोन षटके टाकू शकतो. “हार्दिकचे स्कॅन रिपोर्ट आले आहेत आणि दुखापत फारशी गंभीर नाही. तसेच दोन सामन्यांमध्ये सहा दिवसांचे अंतर असल्याने त्याला बरे होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो,” बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. “परंतु अर्थातच, वैद्यकीय संघ प्रतीक्षा करेल आणि प्रशिक्षण सत्रादरम्यान तो कसा आकार घेतो हे पाहेल,” ते पुढे म्हणाले. दुसरीकडे, पाकिस्तानविरुद्ध सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मीडिया टीमने हार्दिकच्या उजव्या खांद्याचे स्कॅनिंग होत असल्याची माहिती दिली होती. पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात भारताला 10 गडी राखून लाजीरवाणी पराभव पत्करावा लागला.
यानंतर आता भारत आणि न्यूझीलंड संघात 31 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे आणि टीम इंडियाला या स्पर्धेत जोरदार पुनरागमन करण्याच्या निर्धारित असेल. टीम इंडियाला किवी संघाकडून पराभव पत्करावा लागला तर वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांची प्रगती होण्याची शक्यता धोक्यात येईल. यानंतर भारताला अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध सामने खेळायचे आहेत.