'आयपीएलसाठी टी-20 विश्वचषक 2020 स्थगित करण्यात आला' आसीसीच्या निर्णयावर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरची प्रतिक्रिया
शोएब अख्तर (Photo Credit: ScreenGrab/YouTube)

कोरोना संकटामुळे आतराष्ट्रीय क्रिकेट परिषदने ऑस्ट्रेलिया मध्ये होणारा टी-20 विश्वचषक 2020 (ICC Men's T20 World Cup 2020) पुढे ढकलला आहे. ऑस्ट्रेलियाने असमर्थता दर्शवल्यानंतर आयसीसीने टी-20 विश्वचषक 2020 स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आयसीसीच्या या निर्णयावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.ऑस्ट्रेलिया ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणारा टी-20 विश्वचषक स्पर्धा स्थगित केली जाणार आहे, हे आम्हाला अधिच समजले होते. तसेच टी-20 विश्वचषक स्पर्धेपेक्षा इंडियन प्रीमियर लीगला अधिक महत्व दिले जात आहे, असा आरोपही त्यांनी लावला आहे.

टी-20 विश्वचषक 2020 स्थगित झाल्यामुळे येत्या 26 सप्टेंबर ते 7 नोव्हेंबर या काळात आयपीएल 2020 चे आयोजन केले जाण्याची चर्चा सुरु आहे. पण ही बाब पाकिस्तानी खेळाडूंना रूचलेली नाही. जिओ ट्विव्हीशी बोलताना शोएब अख्तरने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, शोएब अख्तरने बीसीसीआयला सर्वाधिक शक्तिशाली बोर्ड म्हणून संबोधित केले आहे. तसेच आयपीएलची स्पर्धा रद्द होऊ नये, यासाठी टी-20 विश्वचषक 2020 स्थगित करण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी ICCवर अप्रत्यक्षपणे केला आहे. विश्वचषक खेळता येऊ शकतो असे सातत्याने आम्ही सांगत होतो. पण भारतीय क्रिकेट बोर्ड आणि आयसीसी तसे होऊ देणार नाही, हे वाटत होते. आणि तसेच झाले. आयपीएलचे कोणत्याही प्रकारे नुकसान होता कामा नये, ते झालेच पाहिजे मग त्यासाठी टी-20 वर्ल्डकप खड्ड्यात गेला तरी चालेल, अशी भूमिका दिसून आली. अशा प्रकारच्या स्पर्धेने लोक खेळाकडून लाखो डॉलर्स मिळवत राहतील, पण क्रिकेटची गुणवत्ता खालावली जाईल, अशीही खदखद शोएब अख्तर यांनी व्यक्त केली आहे. IPL 2020 Update: आयपीएलमध्ये खेळाडूंसाठी इंग्लंडसारखे बायो-सुरक्षा बबल नाही? BCCI अधिकाऱ्याने दिली कोरोना व्हायरस प्रोटोकॉलवर माहिती

यंदाची आयपीएल स्पर्धेचा 13 वा हंगाम युनायटेड अरब अमिराती म्हणजेच युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. आयपीएल काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल म्हणाले आहेत. तसेच गव्हर्निंग काऊन्सिलच्या आगामी बैठकीत याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येईल असेही पटेल म्हणाले आहेत. स्पर्धेच्या तारखांबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.