भारतीय क्रिकेट टीमचा माजी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) ने मुलगा रियो (Rio) सोबतचा एक क्युट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत तो आपला मुलगा रियो सोबतचे काही खास क्षण पाहायला मिळत आहेत. रैना ने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, "कुछ तो बता जिंदगी..अपना पता जिंदगी...' मुलं अत्यंत निष्पाप असतात आणि ते आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात."
या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की, रैना एका कार मधून प्रवास करत आहे. प्रवासात तो सलमान खान चा सुपरहिट सिनेमा बजरंगी भाईजान चे लोकप्रिय गाणे 'कुछ तो बता जिंदगी..अपना पता जिंदगी' ऐकत आणि गात आहे. इतकंच नाही तर कुशीत घेतलेल्या आपल्या चिमुकल्या रियोला देखील तो हे गाणे ऐकवत आहे. विशेष म्हणजो तो चिमुकलाही वडीलांना छान प्रतिसाद देत आहे. दरम्यान, बापलेकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ:
“Kuchh to bata zindagi... apna pata zindagi... “- Babies are the most innocent souls .. and they hold an answer to all our apprehensions. pic.twitter.com/nfLYoFIA8X
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) January 3, 2021
यावर्षी 15 ऑगस्ट रोजी सुरेश रैना याने UAE मधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर यावर्षी तो वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलमध्येही खेळू नाही शकला. (IPL 2020: आयपीएलमध्ये 200 सामने खेळणाऱ्या महेंद्र सिंह धोनीला सुरेश रैनाने दिल्या शुभेच्छा; इंस्टाग्रामवर शेअर केला 'हा' फोटो)
सुरेश रैना लवकरच उत्तर प्रदेशा संघाकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) साठी खेळेल. सय्यद मुश्ताक अली T20 ट्रॉफीला 10 जानेवारीपासून सुरुवात होईल आणि याचा अंतिम सामना 31 जानेवारी 2021 रोजी खेळला जाईल.