
Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad, 43rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 43 वा सामना, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद 25 एप्रिल (शुक्रवार) रोजी एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळवला गेला. या सामन्यात हैदराबादने चेन्नईचा पाच गडी राखून पराभव केला आहे. या रोमांचक सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने 19.5 षटकात ऑलआऊट होवून हैदराबादसमोर 155 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर हैदराबादने 18.4 षटकात पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. (हे देखील वाचा: IPL 2025, MS Dhoni New Record: एमएस धोनीने इतिहास रचला, रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह 'या' खास क्लबमध्ये झाली सामील)
Match 43. Sunrisers Hyderabad Won by 5 Wicket(s) https://t.co/26D3UampFQ #CSKvSRH #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2025
हर्षल पटेलची घातक गोलंदाजी
प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात निराशाजनक झाली. चेन्नईने निर्धारित 19.5 षटकांत दहा गडी गमावून 154 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून डेवॉल्ड ब्रेव्हिसने 42 धावांची सर्वाधिक खेळी केली. या खेळीदरम्यान, त्याने 25 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त, आयुष म्हात्रेने 30 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादकडून हर्षल पटेलने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर कर्णधार पॅट कमिन्सने दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाला 20 षटकांत 155 धावा करायच्या होत्या.
इशान किशनची 44 धावांची शानदार खेळी
त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाची सुरुवातही निराशाजनक झाली आणि अभिषेक शर्माही खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. सनरायझर्स हैदराबाद संघाने १८.४ षटकांत फक्त पाच विकेट गमावून लक्ष्य गाठले. सनरायझर्स हैदराबादकडून इशान किशनने 44 धावांची शानदार खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान, इशान किशनने 34 चेंडूत पाच चौकार आणि एक षटकार मारला. इशान किशन व्यतिरिक्त कामिंदू मेंडिसने नाबाद 32 धावा केल्या. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जकडून स्टार गोलंदाज नूर अहमदने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. नूर अहमदशिवाय खलील अहमद, अंशुल कंबोज आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.