
Sunrisers Hyderabad Cricket Team vs Rajasthan Royals Cricket Team, IPL 2025 2nd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) सुरू झाली आहे. आयपीएलच्या आगामी हंगामात सहभागी होणारे सर्व 10 संघ आगामी हंगामाच्या तयारीत व्यस्त आहेत. प्रत्येक हंगामाप्रमाणे यावेळीही एकूण 74 सामने खेळवले जातील. या हंगामातील दुसरा सामना आज म्हणजेच 23 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद क्रिकेट टीम (KKR) विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्रिकेट टीम (RCB) यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर () खेळला जाईल. या हंगामात सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व पॅट कमिन्स करत आहे. तर, राजस्थान रॉयल्सची कमान तीन सामन्यांसाठी रियान परागच्या खांद्यावर आहे.
गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाने शानदार कामगिरी केली होती. सनरायझर्स हैदराबादने १४ सामने खेळले होते. त्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने 8 सामने जिंकले होते. तर, 5 पराभवांसह ते पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर होते. सनरायझर्स हैदराबादचे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभाग उत्तम फॉर्ममध्ये आहेत. ट्रॅव्हिस हेड आणि हेनरिक क्लासेन यांनी फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजीत पॅट कमिन्स आणि हर्षल पटेल यांच्याकडून संघाला खूप अपेक्षा असतील. SRH vs RR IPL 2025 Live Streaming: आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; भारतात लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
पिच रिपोर्ट
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील स्पर्धेतील दुसरा सामना हैदराबादमध्ये खेळला जाईल. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप उपयुक्त ठरते. ही खेळपट्टी सहसा सपाट असते आणि फलंदाजांना मदत करते. तथापि, फिरकी गोलंदाज देखील येथे प्रभावी ठरू शकतात. हैदराबादमध्ये रात्रीच्या वेळी दव महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घ्यावा. या खेळपट्टीवर पहिल्या डावात सरासरी 175 धावा होतात.
दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन
सनरायझर्स हैदराबाद: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, मोहम्मद शमी, अॅडम झम्पा.
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थीकशन, संदीप शर्मा, तुषार देशपांडे.