Photo Credit - ESPN CricInfo

SL vs AUS 2nd Test:  ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि ॲलेक्स कॅरी यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. या दोन्ही खेळाडूंनी शुक्रवारी श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतके झळकावली. स्मिथने पहिले शतक पूर्ण केले. यानंतर कॅरीनेही शतक झळकावले. ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅरीने कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. वृत्त लिहिपर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 300 धावांचा टप्पा ओलांडला होता.   (हेही वाचा  - त्रिशा गोंगडी जानेवारी महिन्यात महिला ICC Player of The Month साठी नॉमिनेट)

वृत्त लिहिपर्यंत स्टीव्ह स्मिथने 217 चेंडूंचा सामना करत 110 धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 1 षटकार मारला. वृत्त लिहिपर्यंत कॅरीने 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 119 धावा केल्या होत्या. या काळात त्याने 130 चेंडूंचा सामना केला. कॅरी आणि स्मिथमध्ये 200 हून अधिक धावांची भागीदारी झाली. हा स्वतःच एक विक्रम आहे.

स्टीव्ह स्मिथने तोडला सचिनचा विक्रम -

स्टीव्ह स्मिथने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला आहे. सर्वात कमी कसोटी डावात 36 शतके करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. स्मिथने यासाठी 206 डाव खेळले. तर सचिनने 218 डाव खेळले होते. या यादीत रिकी पाँटिंग अव्वल स्थानावर आहे. पाँटिंगने 200 डावात 36 शतके झळकावली होती. कुमार संगकारा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 210 डावात हा पराक्रम केला.

पाहा पोस्ट -

स्मिथ कोहलीचा विक्रम मोडू शकला नाही -

स्टीव्ह स्मिथ सर्वात जलद 17000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. त्याने हा पराक्रम 410 डावात केला. या यादीत स्मिथ नवव्या क्रमांकावर आहे. तर विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू कोहलीने 363 डावात ही कामगिरी केली होती. या यादीत हाशिम आमला दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 381 डावात ही कामगिरी केली.