![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/01/sl.jpg?width=380&height=214)
Sri Lanka National Cricket Team vs Australia National Cricket Team 1st ODI 2025 Live Streaming: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांची एकदिवसीय मालिका 12 फेब्रुवारीपासून सुरू होईल. पहिला एकदिवसीय सामना कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. याआधी दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. ज्यामध्ये स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला त्यांच्याच घरच्या मैदानावर 2-0 ने क्लीन स्वीप केले. तथापि, आता दोन्ही संघांचे लक्ष एकदिवसीय मालिकेवर असेल. चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी पूर्ण करण्यासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. या मालिकेनंतर, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायची आहे. (IND vs ENG 3rd ODI 2025: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माला 'हा' विक्रम करण्याची सुवर्णसंधी, सचिन तेंडुलकरला टाकू शकतो मागे)
दोन्ही संघांनी एकदिवसीय मालिकेसाठी आपापल्या संघांची घोषणा केली आहे. श्रीलंकेचे नेतृत्व चारिथ अस्लंका करत आहे. तर ऑस्ट्रेलियाची कमान स्टीव्ह स्मिथकडे असेल. ऑस्ट्रेलियन संघात अनेक मोठे बदल झाले आहेत. प्रमुख खेळाडू पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मार्कस स्टोइनिस यांना संघातून वगळण्यात आले आहे. अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना कधी खेळला जाईल?
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना बुधवारी 12 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. तर टॉसची वेळ त्यापूर्वी अर्धा तास असेल.
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना कुठे पाहायचा?
भारतात, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर थेट प्रक्षेपित केली जाईल. तर लाईव्ह स्ट्रीमिंग सोनीलिव्ह अॅप, फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
दोन्ही संघांचे खेळाडू
श्रीलंका: पथुम निस्सांका, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडिस, असिता फर्नांडो, लाहिरू कुमारा, चरिथ असलंका (कर्णधार), अविष्का फर्नांडो, नुवानिंदू फर्नांडो, झेनिथ लियानागे, दुनिथ वेलागे, वानिंदू हसरंगा, मोहम्मद शिराज, इशान मलिंगा, महेश थीकशाना, जेफ्री वँडरसे, निशान मदुष्का.
ऑस्ट्रेलिया: स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, कूपर कॉनोली, शॉन अॅबॉट, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, स्पेन्सर जॉन्सन, आरोन हार्डी, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, अॅडम झांपा.