Fastest to 5000 Runs in IPL: सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warner) आयपीएल (IPL) 2020 मधील अबू धाबी येथे झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) सामन्यात एक महत्त्वाचा टप्पा गाठला. वॉर्नरने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) आयपीएलमधील सर्वात वेगवान 5000 धावांचा विक्रम मोडला आणि पहिल्या स्थानी विराजमान झाला. आयपीएलमध्ये 5000 धावांचा टप्पा गाठणारा फक्त चौथ्या फलंदाज वॉर्नरने 135 डावात विक्रम नोंदवला तर आरसीबी कर्णधार कोहलीने 157 डावात पराक्रम केला होता. तिसर्या क्रमांकावर सुरेश रैना आहे ह्याने 173 डावात 5000 आयपीएल धावा केल्या आहेत, त्याच्या मागे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे ज्याने 187 डावात हा टप्पा गाठला होता. (SRH vs KKR, IPL 2020: लोकी फर्ग्युसनने फेरले डेविड वॉर्नरच्या खेळीवर पाणी, नाईट रायडर्सचा सनरायजर्स हैदराबादवर Super विजय)
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जॉनी बेअरस्टोसह सलामीला न येत वॉर्नरने सर्वांना चकित केले. केन विल्यमसन एसआरएचसाठी सलामीला आला आणि 19 चेंडूत 29 धावा करून बाद झाला. वॉर्नर चौथ्या स्थानावर फलंदाजीला आला. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज आयपीएमध्ये 5000 धावा करणारा पहिला परदेशी क्रिकेटपटू आहे. आयपीएलमध्ये विराट कोहली, सुरेश रैना आणि रोहित शर्मा यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर असलेल्या वॉर्नरच्या नावावर चार शतकांची नोंद आहे.
एसआरएच आणि केकेआर यांच्यातील सामन्यात माजी कर्णधार दिनेश कार्तिक आणि विद्यमान कर्णधार इयन मॉर्गनने अखेरच्या काही ओव्हरमध्ये मोठे फटके लगावले आणि टीमला पाच बाद 163 धावांपर्यंत मजल मारून दिली. कार्तिकने नाबाद 29 आणि मॉर्गनने 23 चेंडूत 34 धावा केल्या. केकेआरने 105 धावांवर 4 विकेट गमावले असताना दोघांनी मिळून शेवटच्या पाच षटकांत 58 धावा जोडल्या. मॉर्गनच्या डावात तीन चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता तर 2 चौकार आणि तितकेच षटकार ठोकले. टी नटराजन 40 धावा देत 2 गडी बाद करून सर्वात यशस्वी गोलंदाज होता परंतु विजय शंकर 4 ओव्हरमध्ये 20 धावा देऊन 1 गडी बाद करत सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला.