SRH vs KKR, IPL 2019 Live Cricket Streaming:  हैदराबाद सनरायजर्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याचा थरार  Star Sports आणि Hotstar Online वर पहा लाईव्ह
SRH vs KKR (File Photo)

Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Live Streaming and Score: हैदराबादमध्ये आज राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Cricket Stadium)  हैदराबाद विरूद्ध कोलकत्ता असा आयपीएल 12 सीझन मधील 38 वा सामना रंगणार आहे. यासामन्यामध्ये हैदराबाद सनरायजर्स (Sunrisers Hyderabad) संघ कोलकाता  नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) सोबत भिडणार आहे. सध्या दोन्ही संघांचा आणि पॉंईट टेबलचा विचार करता हैदराबाद संघ पाचव्या आणि कोलकाता संघ सहाव्या स्थानावर आहे. आज दुपारी चार वाजता रंगणारा हा सामना टीव्हीप्रमाणेच हॉट्स्टार ऑनलाईन आणि स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे.

कुठे पहाल ऑन लाईन सामना? 

हैदराबाद संघाने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा. तर या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तर या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 टॉस

कशी असेल टीम?

केन विलियमसन (कर्णधार), डेविड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, विजय शंकर, दीपक हुड्डा, यूसुफ पठान, राशिद खान, शाहबाज नदीम, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि  संदीप शर्मा

कोलकाता नाइट राइडर्स: दिनेश कार्तिक (कर्णधार), क्रिस लिन, सुनील नरेन, शुभमन गिल, रॉबी उथप्पा, नितीश राणा, आंद्रे रसेल, कुलदीप यादव, पीयूष चावला, हैरी गर्ने आणि प्रसिद्ध कृष्णा

यंदाच्या सीझनमध्ये अस्तित्त्व टिकवून ठेवण्याच्य दृष्टीने दोन्ही संघांना आता अटीतटीची लढाई करावी करणार आहे.