सौरव गांगुलीची हॉस्पिटलमधून घरवापसी (Photo Credit: PTI)

Sourav Ganguly Health Update: भारताचे माजी कर्णधार आणि विद्यमान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना अखेर गुरुवारी कोलकाताच्या (Kolkata) वुडलँड्स हॉस्पिटलमधून (Woodlands Hospital) डिस्चार्ज देण्यात आले. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर शनिवारी गांगुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे तपासणी नंतर उघडकीस आले. गांगुली यांना बुधवारी डिस्चार्ज मिळणार होता पण हॉस्पिटलमध्ये अजून एक दिवस थांबण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर अखेर गुरुवारी, म्हणजे आजच त्याची घरवापसी झाली. ANI ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गांगुलीने आपल्या तब्येतीची माहिती दिली आणि सर्व डॉक्टरांचे आपली काळजी घेतल्याबद्दल आभार मानले. "मी उपचारांसाठी रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानतो. मी पूर्णपणे ठीक आहे. आशा आहे की, मी लवकरच उड्डाण करायला तयार होइन,” गांगुलीने वुडलँड हॉस्पिटलबाहेर पत्रकारांना सांगितले. (Sourav Ganguly Health Update: सौरव गांगुली ‘Clinically Fit’; 7 जानेवारीला मिळणार डिस्चार्ज)

गांगुलीची पाच दिवस रूग्णालयात राही घरवापसी झाली आणि आता त्यांची घरीच देखरेख केली जाईल. गांगुलीवर डॉक्टर सतत नजर ठेवतील आणि वेळोवेळी योग्य ते उपचार केल्या जातील असे रुग्णालयाने म्हटले आहे. मंगळवारी बुलेटिनमध्ये रुग्णालयाने म्हटले होते की, "नियमित रक्ताच्या टेस्टचा अहवाल समाधानकारक आहे, इकोकार्डियोग्राफीमध्ये डावी वेंट्रिक्युलर फंक्शन संरक्षित असल्याचे दिसून आले आहे, ज्याचा उत्सर्जन raction 56 टक्के आहे." मंगळवारी वुडलँड्स हॉस्पिटलच्या एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली बसू यांनी सांगितले की, माजी कर्णधाराचे दररोज घरीच परीक्षण केले जाईल. गांगुलीच्या प्रकृतीविषयी पत्रकारांना माहिती देताना डॉ. बसू म्हणाल्या की, 48 वर्षीय गांगुली पुढील प्रक्रियेसाठी किंवा वैद्यकीय हस्तक्षेपासाठी सुमारे 2-3 आठवड्यांनंतर तयार होतील.

शिवाय, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यांनतर गांगुलीने त्याचा बालपणीचा मित्र जॉयदीपचे आभार मानले. गांगुलीने इंस्टाग्रामवर लिहिले की, “तू मागील 5 दिवसात माझ्यासाठी जे  केले ते माझ्या आयुष्यभर लक्षात राहील. मी तुम्हाला 40 वर्षांपासून ओळखतो आणि तू कुटूंबापेक्षा अधिक आहेस.

 

View this post on Instagram

 

A post shared by SOURAV GANGULY (@souravganguly)

हृदय व तज्ज्ञ डॉ. देवी शेट्टी यांनीही गांगुलीवर उपचार करणाऱ्या नऊ डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाची भेट घेतली आणि त्यानंतर रुग्णालयाकडून पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात आला. डॉ. शेट्टी म्हणाले की, गांगुलीचे हृदय तितकेच दृढ आहे जितके भारताचे माजी कर्णधार 20 वर्षांचे असताना होते. शनिवारी सौरव गांगुली यांच्या हृदयात तीन ब्लॉकेज असल्याचे समोर आले ज्यानंतर ते काढण्यासाठी एक स्टेंट लावला गेला.