Sourav Ganguly Birthday Special: फिक्सिंगच्या भोवऱ्यात सापडलेल्या टीम इंडियाची धुरा सांभाळत ‘दादा’ने ‘या’ 5 निर्णयांनी केला भारतीय संघाचा कायापालट
सौरव गांगुली वाढदिवस (Photo Credit: File Image)

Sourav Ganguly Birthday Special: भारतीय संघाचा (Indian Team) माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आज आपला 49वा वाढदिवस साजरा करत आहे. गांगुलीने 1992 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे आणि 1996 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर लॉर्ड्स (Lords) येथे कसोटी पदार्पण केलं होतं. 90च्या दशकात गांगुली हा भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार होता. त्याने टीम इंडियावर (Team India) आपली पकड मजबूत केली व  खऱ्या अर्थाने संघाला नवीन दिशा दिली. कर्णधार म्हणून गांगुलीची कारकीर्द विवादास्पद ठरली असली तरी त्याने संघाची कमान त्यावेळी सांभाळली जेव्हा भारतीय क्रिकेट संघ फिक्सिंगच्या भोवऱ्यात सापडला होता. (‘Sourav Ganguly याला कर्णधार म्हणून परिश्रम नाही तर फक्त नियंत्रण मिळवायचे होते,’ माजी प्रशिक्षक Greg Chappell यांचा मोठा आरोप)

2000 मध्ये टीमच्या काही खेळाडूंच्या मॅच फिक्सिंग घोटाळ्यानंतर, गांगुलीला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. संघात मोठी जबाबदारी घेत गांगुलीने आपल्या निर्णयाने संघाचा कायापालट केला.

1. हेडिंगलेच्या ढगाळ परिस्थितीत पहिले फलंदाजीचा निर्णय

हेडिंगले येथे इंग्लंड आणि भारत यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात आले असून खेळपट्टी ढगाळ वातावरणामुळे गोलंदाजीसाठी अनुकूल होती. सौरव गांगुलीने टॉस जिंकला आणि सर्वांनाच आश्चर्य करत त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 628-8 धावांपर्यंत मजल मारली तेव्हा हा मास्टरस्ट्रोक असल्याचे सिद्ध झाले. पहिल्या डावात इंग्लंडने फक्त 273 धावांपर्यंत मजल मारली ज्यांनंतर गांगुलीने फॉलोऑन दिला. इंग्लंडचा कर्णधार नासिर हुसेनचे शतक पुरेसे नव्हते कारण ब्रिटिश संघाला एक डाव आणि 46 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

2. वीरेंद्र सेहवागला ओपनर म्हणून बढती

मधल्या फळीतील फलंदाज म्हणून सेहवागने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात केली. तथापि, गांगुलीने त्याला सलामीला प्रोत्साहन देण्याची संधी पाहिली आणि कसोटी सामन्यांमध्ये त्याने असेच केले. सेहवागने अटॅकिंग प्लेची भूमिका पुन्हा परिभाषित केली, जे रेड बॉल क्रिकेटमध्ये कधीही पहिले गेले नव्हते. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीरने 8000 पेक्षा जास्त धावा फटकावल्या. तसेच कसोटीत सर्वात वेगवान तिहेरी शतक ठोकण्याचा विक्रमही त्याने आपल्या कारकीर्दीत केला आहे.

3. कोलकाता कसोटी सचिनला दिला चेंडू

2001 मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऐतिहासिक कोलकाता कसोटी सामना आजवरचा सर्वात चर्चित सामना आहे. राहुल द्रविड-व्हीव्हीएस लक्ष्मणची विक्रमी भागीदारी, हरभजन सिंहच्या फिरकी गोलंदाजीबद्दल अनेकदा बोलले जाते पण आणखी एक पैलू आहे ज्याबद्दल कमी ज्यांना माहित असेसला. शेवटच्या दिवशी उशिरा गांगुलीने तेंडुलकरकडे चेंडू सोपवला. 161/3 असताना कांगारू संघ विजय मिळवतील असे दिसत होते कारण भज्जीने चहानंतर रिकी पॉन्टिंग आणि स्टीव्ह वॉ यांना बाद करण्यासाठी कठोर परिश्रम केले. तेंडुलकरच्या चेंडूवर अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन स्वीप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात स्टम्प आऊट झाले. त्यानंतर सचिनने शेन वॉर्नलाही माघारी धाडलं आणि उर्वरित विकेट्स फक्त औपचारिकता होती.

4. राहुल द्रविडला दिली विकेटकिपिंगची जबाबदारी

गांगुलीने घेतलेल्या प्रमुख निर्णयांपैकी एक म्हणजे एकदिवसीय सामन्यात राहुल द्रविडला विकेटकिपिंगची जबाबदारी देणे. माजी भारतीय कर्णधाराने संघाचा संतुलन राखण्यासाठी हे केले आणि द्रविडने काम करण्यास प्राधान्य दिले नसले तरी त्याने संघाच्या फायद्यासाठी केले. यामुळे भारतीय संघाला एक अतिरिक्त फलंदाज खेळण्याची संधी मिळाली. गांगुलीने निर्णयाबाबत स्पष्टीकरण देत म्हणाले की द्रविडसाठी हे काम करणे कठीण आहे; तथापि, त्याने पहिले संघाबद्दल विचार केला.

5. नेक्स्ट-जनरेशन खेळाडूंना तयार केले

युवराज सिंह, झहीर खान, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि हरभजन सिंह यासारख्या खेळाडूंना प्रोत्साहन आणि तयार करण्यासाठीही गांगुली ने हत्त्वपूर्ण भूमिका होती. या सर्व खेळाडूंनी संघात 2007 टी-20 वर्ल्ड कप आणि चार वर्षांनंतर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत संघासाठी निर्णायक भूमिका बजावली होती. तसेच त्यांनी इरफान पठाणच्या समावेशालाही त्यांनी पाठिंबा दर्शविला जे भारताच्या सर्वोत्तम स्विंग गोलंदाजांपैकी एक बनला. गांगुलीने एमएस धोनीलाही संधी दिली.