भारतीय संघ सध्या लंडनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final-2023) चा अंतिम सामना खेळत आहे. या सामन्यात भारताला विजयासाठी 444 धावांचे लक्ष्य मिळाले होते. दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) एका बाबतीत महान सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) मागे टाकले आहे. कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या, त्यानंतर भारताचा डाव 296 धावांवर संपला.
सचिनला टाकले मागे
दरम्यान, सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो आता तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या डावातील 7व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रोहितने फाइन लेगच्या दिशेने षटकार ठोकला आणि सचिनला मागे टाकले. (हे देखील वाचा: Out Or Not Out: शुभमन गिलच्या विकेटवर पंचाचा चुकीचा निर्णय, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला राग)
View this post on Instagram
सेहवाग आहे टॉपर
रोहितच्या नावावर आता टेस्ट फॉरमॅटमध्ये एकूण 70 षटकार आहेत. महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरच्या नावावर या दीर्घ फॉर्मेटमध्ये 69 षटकार आहेत. या यादीत भारताचा माजी अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचे नाव अग्रस्थानी आहे. सेहवागने आपल्या कसोटी कारकिर्दीत 90 षटकार ठोकले. दुसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (78 षटकार) आहे. या यादीत रोहित आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.