Pakistan Cricket Team: पाकिस्तानचा (Pakistan) माजी दिग्गज कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) राष्ट्रीय संघात खेळाडूंच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. क्रिकेट पाकिस्तानला दिलेल्या मुलाखतीत आफ्रिदी म्हणाला की राष्ट्रीय संघाकडून खेळणे आता अधिक सोपे झाले आहे. आफ्रिदीने विशेषत: मर्यादित षटकांच्या पाकिस्तान संघात खेळाडू बदलणे व संघात पदार्पण करण्यावर टीका केली. पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यापूर्वी खेळाडूंनी अधिक घरगुती सामने खेळले पाहिजेत, असे 44 वर्षीय आफ्रिदीने म्हटले आहे. आफ्रिदीचा असा विश्वास आहे की खेळाडूंनी त्यांच्या स्वभावाचे अधिक चांगले मूल्यांकन करण्यासाठी किमान दोन वर्षे देशांतर्गत सेटमध्ये भाग घेतला पाहिजे. दरम्यान, पीसीबीच्या (PCB) निवड प्रक्रियेतील त्रुटी दाखवणारा आफ्रिदी पहिला पाकिस्तानी नाही. यापूर्वी पाकिस्तानचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सलमान बट्टनेही (Salman Butt) अशीच सूचना सुचवली होती. (या 5 स्टार क्रिकेटपटूंनी निवृत्तीतून केलं आंतरराष्ट्रीय कमबॅक, यादीत भारतीय नव्हे बड्या पाकिस्तानी खेळाडूंचे राज्य)
रमीझ राजा आणि शोएब अख्तर यांच्यासह इतर अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी यापूर्वी निवड प्रक्रियेबाबत अशीच चिंता व्यक्त केली होती. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अकाली निवृत्ती घेतलेला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरनेही सदोष निवड प्रक्रियेबद्दल पीसीबीला फटकारले होते. नुकताच पाकिस्तानचा माजी महान मोईन खान यांचा मुलगा आझम खानला इंग्लंड दौर्यासाठी पाकिस्तानच्या टी-20 संघात स्थान देण्यात आले. 2020-21 कैद-ए-आजम करंडक स्पर्धेत सिंधकडून पदार्पण झाल्यापासून फक्त 8 प्रथम श्रेणी सामन्यांत खानला घरगुती सेटअपमध्ये खेळण्याचा अनुभव नाही आहे. सध्याच्या पाकिस्तानी संघात खानसारखी इतरही अनेक उदाहरणे आहेत.
Shahid Afridi "these days it has become too easy to play for the national team whereas in the past playing for the Pakistan team was the ultimate for any professional cricketer" #Cricket
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) July 7, 2021
दरम्यान, 1996 ते 2018 दरम्यान पाकिस्तानकडून खेळलेला आफ्रिदी नव्याने सुरू झालेल्या काश्मीर प्रीमियर लीगमध्ये (केपीएल) रावलाकोट हॉक्सचा कर्णधार म्हणून खेळताना दिसणार आहे. फ्रँचायझी टूर्नामेंट पाकिस्तान-व्याप्त काश्मीरच्या (पीओके) लोकांसाठी पहिल्यांदा आयोजित करण्यात आले आहे आणि या क्षेत्रातील शहरांचे प्रतिनिधित्व करणारे सहा संघ पाहायला मिळतील. या स्पर्धेतील सर्व सामने पीओकेच्या मुझफ्फराबाद स्टेडियममध्ये 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान खेळले जाणार आहेत.