Video: डेव्हिड वॉर्नर याने असा फटका मारला की, शाहीन आफ्रिदी चेंडू शोधतच राहिला, सोशल मीडियावर झाला ट्रोल
शाहीन आफ्रिदी (Photo Credits: Twitter/@cricketcomau)

ऑस्ट्रेलिया (Australia) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात अ‍ॅडिलेड (Adelaide) मध्ये दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना विशेष आहे कारण ही डे-नाईट टेस्ट आहे आणि या सामन्यात गुलाबी बॉल वापरला जात आहे. ऑस्ट्रेलियाने आजवर पाच डे-नाईट सामने खेळत सर्वांमध्ये 100 टक्के विजयाची नोंद केली आहे. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यजमान संघाचा हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले. ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) आणि नंतर मार्नस लाबुशेन याने पाकिस्तानी खेळाडूंची शाळाच घेतली. दोन्ही गोलंदाजांच्या प्रत्येक चेंडूवर मोठे शॉट्स खेळले. दरम्यान, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो खूप पसंत करण्यात येत आहे. वॉर्नरने एक अससी शॉट खेळला त्याच्यानंतर पाकिस्तानी फील्डरला चेंडू दिसलाच नाही. त्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. (AUS vs PAK 2nd Test: मार्नस लाबुशेन याने केली स्टिव्ह स्मिथ याची नकल, गुरुकडून शिकत आहे शिष्य म्हणाले Netizens)

इफ्तेकर अहमद 42 वा ओव्हर टाकण्यासाठी आला. वॉर्नर क्रीजवर उपस्थित होता. त्याने इफ्तेकरच्या चेंडूवर ऑफ दिशेला शॉट खेळला. वॉर्नर एक धाव घेण्यासाठी धावला. सीमारेषेवर उभ्या असलेल्या शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) चेंडू शोधत राहिला, पण तोवर चेंडूने चौकारासाठी सीमारेषा पार केली होती. शाहीनची प्रतिक्रिया खूप व्हायरल होत आहे. पाहा व्हिडिओ:

नेटकऱ्यांची दिली अशी प्रतिक्रिया:

पैसे दिले आहेत!

हाहाहा!

आपण कोणाच्या बाजूचे आहात?

मी तुझी बाजू आहे

शाहीन आफ्रिदीचा आज मैदानात खडतर दिवस आहे

ऑस्ट्रेलिया पहिले फलंदाजी करत मजबूत स्थितीत पोहचला आहे. वॉर्नर आणि लाबूशेनने मिळून पाकिस्तानी गोलंदाजांची शाळाच घेतली. वॉर्नर आणिलाबूशेनने त्यांचे शतक पूर्ण केले आहे. आणि दोघांमध्ये 200 पेक्षा अधिक धावांची भागीदारीही झाली आहे.