Happy Birthday Sachin: सचिन तेंडुलकरच्या ४६व्या वाढदिवशी जाणून घ्या सचिन विषयीच्या दहा फंडू गोष्टी
Sachin Tendulkar (Photo Credits: File Image)

Happy 46th Birthday Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)ला केवळ देशातच नाही तर जगभरातल्या क्रिकेट प्रेमींच्या मनात आदराचं स्थान प्राप्त झालय. क्रिकेट विश्वातील देव म्हणून पहिल्या जाणाऱ्या सचिनचा आज 24 एप्रिलला वाढदिवस आहे. वयाचं अर्धशतक पूर्ण करण्याच्या मार्गावर असलेला हा मास्टर ब्लास्टरचा यंदा 46व्या वर्षात पदार्पण करणार आहे.

तसं तर सचिनच्या डाय हार्ड फॅन्स ना त्याच्या बद्दल एकूण एक अपडेट माहित असतात. त्याच्या सोशल मीडियावर देखील या चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. आज सचिनच्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट मधील कोहिनूर हिऱ्याचे म्हणजे सचिन तेंडुलकरचे आपल्याला माहित नसणारे पैलू जाणून घेऊयात.. Happy Birthday Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 23 वर्षाच्या करिअरमधील पाच सर्वोत्कृष्ट सामने

1) सचिन ने खेळाडू म्हणून जरी वयाच्या 16व्या वर्षी क्रिकेट क्षेत्रात पदार्पण केलं असलं तरी त्याची या खेळाशी जोडलेली नाळ फार जुनी आहे. 1987 च्या वर्ल्डकप च्या वेळी सचिन 14 वर्षाचा असताना वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) वर झालेल्या इंडिया विरुद्ध झिम्बाम्बावे (India vs Zimbambve) सामन्यात बॉल बॉय म्हणून सहभागी होता. त्यानंतर लगेचच 1988 मध्ये ब्राबॉऊर्न स्टेडियम (Brabroun Stadium) मध्ये पार पडलेल्या इंडिया विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) या सराव सामन्यात सचिनने पाकिस्तानच्या बाजूने मैदानात फिल्डिंग केली होती.

 

View this post on Instagram

 

Taken in the early years of my cricketing career. India's tour of New Zealand, 1989-90. #Nostalgia

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

 

2) उन्हाळ्याच्या सुट्टीत एका रविवारी सचिन झाडावरून पडल्यावर, भाऊ अजितने त्याला शिक्षा म्हणून क्रिकेटच्या सरावाला जायला सांगितलं होतं त्यानंतर सचिनला जे क्रिकेटचे वेड लागले ते कायमचे! प्रशिक्षक रमाकांत आचरेकर (Ramakant Acharekar) यांच्याकडे क्रिकेटचे धडे घेतल्यावर हा लिटिल मास्टर झोपताना देखील क्रिकेटचे गिअर घालूनच झोपायचा. सुरवातीच्या दिवसांमध्ये सरावात पूर्ण वेळ आऊट न होता बॅटिंग केल्यावर गुरु आचरेकर सचिनला एक कॉइन देत असे. सचिनने असे 13 कॉईन्स मिळवले होते.

 

3) सचिन वयाच्या 19 व्या वर्षी देशासाठी खेळणारा सर्वात तरुण क्रिकेटर होता. त्याने रणजी ट्रॉफी साठी पदार्पण केलेल्या संन्ह्यात रवी शास्त्री हे भारताचे कर्णधार होते. सचिनने रणजी ट्रॉफी, इराणी आणि ड्युलीप ट्रॉफी, साठी पदार्पण केलेल्या पहिल्याच सामन्यात शतक लावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आजवर सचिन ने रणजी ट्रॉफी चे 36 सामने खेळले आहेत.

 

4) सचिनची बॅट इतर खेळाडूंच्या तुलनेत सर्वात जड आहे, या बॅटचं वजन दीड किलो इतकं असून साऊथ आफ्रिकेच्या लेन्स क्लुसनेर (Lance Klusener) नंतर एवढी जड बॅट वापरणारा सचिन जगभरात दुसरा खेळाडू आहे. सचिनच्या पहिल्या टेस्ट मॅच दरम्यान फास्ट बॉलर अॅलन मुल्लाली (Alan Mullally) ने या बॅट ची रुंदी इतरांपेक्षा अधिक असल्याची तक्रार केली होती.

 

View this post on Instagram

 

Believe you can and you're halfway there. ~ Theodore Roosevelt #MondayMotivation

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

 

5) आजवर सचिनला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. भारत सरकारने देखील सचिनला राजीव गांधी खेळ रत्न, अर्जुन पुरस्कार व सर्वोच्च  मानला जाणारा पद्मश्री तसेच भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविलं आहे. या सर्व पुरस्कारांवर आपलं नाव कोरणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव भारतीय क्रिकेटर आहे.

 

6) सचिनने आजवर अनेक मोठ्या कंपनीच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. मात्र याची सुरवात स्टीकिंग प्लास्टर या उत्पादनाच्या जाहिरातींपासून झाली होती. 1990 पासून कपिल देव सोबत वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये सचिनला पाहायला मिळालं होत मात्र त्याने स्वतंत्रपणे एंडॉर्स केलेला बूस्ट हा पहिला ब्रँड आहे.

 

7) 1990 मध्ये इंग्लंड दौऱ्यावरून परत येताना मुंबई एयरपोर्टवर सचिन आणि अंजली यांची पाहिली भेट झाली होती, त्यानंतर वयाच्या 22 व्या वर्षी त्याने अंजलीसोबत लग्नगाठ बांधली. सचिन आणि अंजलीची मुलगी सारा हीच नाव हे 1997 च्या 'सहारा कप' च्या आधारावर ठरवण्यात आलं होतं.

 

8) सचिनला खाण्याची भारी हौस आहे. एका मुलाखतीत सचिनने वडापाव हा आपली कमजोरी असल्याची कबुली दिली होती. सचिनने लहान असताना आईला बेडकाच्या भाजीची पाककृती (रेसिपी) शोधायला लावली होती. त्यासोबतच सचिनला अत्तर, घड्याळे, किशोर कुमारांची गाणी तसेच गाड्यांची प्रचंड आवड आहे. सचिन आपल्या फेरारी (Ferrari) या गाडीची इतकी काळजी घेतो की त्याची पत्नी अंजलीला देखील ही गाडी चालवायची परवानगी देत नाही.

 

View this post on Instagram

 

Breakfast in bed cooked by my son Arjun :-) best breakfast ever!!!

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

 

9) 1992 मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात कमी वेळात 1000 धावा पूर्ण करणारा सचिन हा सर्वात लहान खेळाडू मनाला जातो. आता टेस्ट मॅच मध्ये 40 विकेट्स आणि 11000 धावांचा विक्रम देखील त्याच्या नावावर आहे, सचिनला आजवर टेस्ट मधील सर्वाधिक कॅप् मिळाल्या आहेत. 1998 मध्ये सचिनने 9 ओडीआय शतकं लावली आहेत.

10) 2007, मध्ये 'वर्जिन कॉमिक्स' ने 'मास्टर ब्लास्टर' नावाचा कार्टून सुपरहिरो बनवून सचिनच्या नावावर नवीन कॉमिक पुस्तकांची सिरीज लाँच केली होती.

दरवर्षी सचिनचा वाढदिवस चाहते आणि कुटुंब अगदी दिमाखात साजरं करत त्यामुळे यंदा सचिन आपल्या बर्थडे ला काय करणार याविषयी सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे.