Happy Birthday Sachin:  46 व्या बर्थ डे दिवशी सचिन तेंडुलकरने राहत्या घराबाहेर रसिकांच्या शुभेच्छांचा केला स्वीकार
Sachin Tendulkar (Photo Credits: @ANI/Twitter)

Sachin Tendulkar 46th Birthday: क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आज त्याचा 46 वा वाढदिवस आहे. वांद्रे येथील राहत्या घरी आज सचिन तेंडुलकरने त्याच्या चाहत्यांना झलक दाखवत शुभेच्छांचा स्वीकार केला. सचिन तेंडुलकरने 2013 साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आहे. सध्या तो आयपीएलच्या मुंबई इंडियंस (Mumbai Indians) संघाचा मेंटॉर आहे. Happy Birthday Sachin: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर करणार 46व्या वर्षात पदार्पण, सोशल मीडियावर फॅन्स असा साजरा करणार वाढदिवस

राजकारण, कला, क्रीडा क्षेत्रातील देशा-परदेशातील सचिन चाहते त्याच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

सचिन ने खेळाडू म्हणून जरी वयाच्या 16व्या वर्षी क्रिकेट क्षेत्रात पदार्पण केलं असलं तरी त्याची या खेळाशी जोडलेली नाळ फार जुनी आहे. 1987 च्या वर्ल्डकप च्या वेळी सचिन 14 वर्षाचा असताना वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) वर झालेल्या इंडिया विरुद्ध झिम्बाम्बावे (India vs Zimbambve) सामन्यात बॉल बॉय म्हणून सहभागी होता. त्यानंतर लगेचच 1988 मध्ये ब्रेबॉन स्टेडियम (Brabroun Stadium) मध्ये पार पडलेल्या इंडिया विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) या सराव सामन्यात सचिनने पाकिस्तानच्या बाजूने मैदानात फिल्डिंग केली होती.