दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (Photo Credit: Twitter/ICC)

SA vs ENG ODIs 2020: यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि इंग्लंड (England) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना 4 डिसेंबर रोजी खेळला जाणार होता, परंतु कोरोनाच्या (Coronavirus) प्रकरणानंतर सामना 6 डिसेंबरसाठी पुढे ढकलण्यात आला. आज म्हणजेच 6 डिसेंबरला केप टाऊन ऐवजी पार्ल (Paarl) येथे सामना खेळला जाणार होता, परंतु सामन्यापूर्वी या धक्कादायक बातमी समोर आली ज्यानंतर सामना दुसऱ्यांदा पुन्हा एकदा रद्द करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचे संघ (England Cricket Team) ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करत आहेत तेथील दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले ज्यामुळे सामन्याची सुरुवात पुढे ढकलण्यात आली आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका (Cricket South Africa)) यांनी पार्ल येथे होणाऱ्या आजच्या वनडे सामन्यात विलंब करण्यास सहमती दर्शविली होती आहे. शनिवारी सायंकाळी इंग्लंड खेळाडू आणि व्यवस्थापनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने पीसीआरची अतिरिक्त टेस्ट करवण्यात आली. (SA vs ENG 1st ODI: दक्षिण आफ्रिका क्रिकेटर COVID-19 पॉसिटीव्ह, इंग्लंडविरुद्ध पहिला वनडे सामना स्थगित)

दक्षिण आफ्रिका-इंग्लंडमधील वनडे मालिकेवर कोरोनाचे ढग दाटलेले दिसत आहेत. याआधी एकदिवसीय मालिका शुक्रवारी सुरू होणार होती, पण दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूचा कोरोना व्हायरस अहवाल सकारात्मक आल्यानंतर सामना रविवारीपर्यंत स्थगित करण्यात आला. इंग्लंडने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, इंग्लंड संघातील खेळाडूंचे नमुने पुन्हा एकदा तपासासाठी पाठविण्यात आले आहेत असून अहवाल येणे बाकी आहे. शनिवारी सायंकाळी नमुने घेण्यात आले आहेत तर कोरोना अहवालानंतरच सामना खेळला जाईल. शुक्रवारी संध्याकाळी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची पुन्हा टेस्ट करवण्यात आली असून सर्व खेळाडूंचा अहवाल नकारात्मक आला.

दरम्यान, शुक्रवारी इंग्लंड खेळाडूंची चाचणी घेण्यात आली नव्हती कारण गुरुवारी म्हणजेच आदल्या दिवशी सर्व खेळाडूंचा अहवाल नकारात्मक आला होता. पण आता हॉटेलमधील दोन कर्मचारी सकारात्मक आल्यानंतर पुन्हा एकदा इंग्लंडच्या सर्व खेळाडूंची शनिवारी कोरोना टेस्ट करवण्यात आली आहे. दुसरीकडे, दोन्ही संघात यापूर्वी टी-20 मालिका खेळण्यात आली होती ज्यात यजमान संघाला क्लीन स्वीपचा सामना करावा लागला होता.