राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: PTI)

RR vs SRH IPL 2021: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरोधात आयपीएलच्या  (IPL) 28व्या सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाला मोसमातील सातव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राजस्थानने दिलेल्या 221 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात हैदराबाद 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 165 धावाच करू शकली परिणामी संघाला 55 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. सनरायझर्सने आजच्या सामान्यापासून केन विल्यमसनला (Kane Williamson) कर्णधार म्हणून उतरवले होते पण त्याचा संघाला फायदा झाला नाही आणि संघ पराभवापासून पराभवाकडेच गेला. हैदराबादसाठी मनीष पांडेने (Manish Pandey) सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. तसेच जॉनी बेयरस्टोने 30 धावा, कर्णधार विल्यमसनने 20 धावा आणि केदार जाधवने 19 धावा केल्या. दुसरीकडे, राजस्थानकडून मुस्तफिजूर रहमान (Mustafizur Rahman) आणि क्रिस मॉरिसने (Chris Morrsi) सर्वाधिक 3 विकेट्स काढल्या. शिवाय कार्तिक त्यागी व राहुल तेवतियाला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IPL 2021: मनीष पांडेमुळे गेले David Warner याचे कर्णधारपद? SRH कर्णधारपदाच्या चर्चेत Simon Doull यांनी केलं धक्कादायक विधान)

राजस्थानने दिलेल्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना मनीष पांडे व बेयरस्टोच्या जोडीने संघाला शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी पॉवर-प्ले ओव्हरमध्ये बिनबाद 57 धावा केल्या पण पुढील ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर मुस्तफिजुर रहमानने हैदराबादला पहिला झटका दिला आणि मनिषला 31 धावांवर बोल्ड केलं. त्यानंतर संघ एकापाठोपाठ नियमित अंतराने विकेट गमावत राहिला. बेयरस्टोने 30 धावांची खेळी केली. विजय शंकरही काही खास करू शकला नाही आणि 8 धावा करून तंबुत परतला. कर्णधार केन विलियमनस 21 धावा करुन आऊट झाला. यानंतर आलेल्या मोहम्मद नबीने 14 व्या ओव्हरमध्ये तेवतियाच्या गोलंदाजीवर 2 खणखणीत सिक्स लगावले पण मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला व 17 धावा करुन आऊट झाला. केदार जाधवच्या अपयशाचे सत्र यंदाही सुरूच राहिले. जाधवने 19 धावांची खेळी केली तर राशिद खान भोपळा न फोडता तंबूत परतला.

यापूर्वी टॉस गमावून पहिले फलंदाजी करत राजस्थानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 220 धावांचा डोंगर उभारला. राजस्थानकडून ओपनर जोस बटलरने सर्वाधिक 124 धावांची जबरदस्त खेळी केली तर संजू सॅमसनने 48 धावा केल्या. दुसरीकडे, हैदराबादकडून राशिद खान, संदीप शर्मा आणि विजय शंकरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.