सायमन डुल आणि डेविड वॉर्नर (Photo Credit: Twitter)

IPL 2021: आयपीएल (IPL) फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad_ संघाच्या कर्णधारपदावरून डेविड वॉर्नरच्या (David Warner) हाकलपट्टीवरून सध्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. हैदराबादने आयपीएलच्या मध्यात संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी केन विल्यमसनला देण्याचा निर्णय जाहीर केला. आयपीएल 2021 च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार वॉर्नरला काढून टाकण्याचं संभाव्य कारण न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू सायमन डुल (Simon Doull) यांनी निदर्शनास आणून दिले आहे. डूल यांच्या म्हणण्यानुसार वॉर्नरचा टीम मॅनेजमेंटशी वाद होता आणि त्याचबरोबर मनीष पांडेबद्दलच्या (Manish Pandey) टिपण्णीमुळे हा वाद आणखी वाढला. डूल यांनी संवाद साधताना नमूद केले, वॉर्नरने मनीष पांडेच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढण्याच्या अलीकडील टिप्पणी सनरायझर्स टीम मॅनेजमेंटला पसंत पडलं नसल्याचं म्हटलं. (IPL 2021: सनरायझर्स हैदराबादच्या उर्वरित सामन्यांमध्ये Kane Williamson ला मिळाली कर्णधारपदाची जबाबदारी, डेविड वॉर्नरकडून हिसकावली कॅप्टन्सी)

Cricbuzz ला दिलेल्या मुलाखतीत डुल यांनी म्हटले की, “मनीष पांडेला बाहेर टाकण्याविषयीच्या त्या गेममध्ये त्याने जे काय म्हटले, तो त्याचा निर्णय नव्हता, त्याला ते स्पष्टपणे करायचे नव्हते. आणि मुळात, याचा दोष तुम्ही दुसर्‍यावर दिला आणि मला असे वाटते की त्याने त्याची किंमत मोजली आहे.”वॉर्नरने म्हटले होते की, पांडेला प्लेइंग इलेव्हनमधून वगळणे कठोर निर्णय आहे. हैदराबादच्या खराब कामगिरीमुळे वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आहे असे अनेकांना वाटत होते, मात्र अनेकांचा असा विश्वास आहे की दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या पराभवानंतर वॉर्नरने पांडेसंदर्भात केलेल्या एका विधानानंतर त्याला कर्णधारपदावरून दूर करण्यात आले आहे. “ते डायनॅमिक ... तुम्ही प्रशिक्षक टॉम मूडी यांना काढून टाकता, तुम्ही ट्रेवर बेलिसला काम देता आणि मग तुम्ही तुमच्या क्रिकेटची देखरेख करण्यासाठी टॉम मूडीला परत आणता. हे नाते शक्यतो कसे कार्य करू शकते हे मला माहित नाही. आणि मला आश्चर्य वाटते की 5 (6) मधील एक विजय हा त्या संबंधात कार्य न करण्याचा थेट परिणाम आहे... आणि डेव्हिड वॉर्नर] आता आणखी खेळणार नाही, हे आणखी विचित्र आहे,” डुल म्हणाले.

लक्ष्य घेण्यासारखे म्हणजे वॉर्नरच्या नेतृत्वात 2016 मध्ये हैदराबादने त्यांचे पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले होते. ऑस्ट्रेलियन खेळाडूची कर्णधारपदावरून काढण्याच्या निर्णयाची घोषणा करताना सनरायझर्स हैदराबादने आपल्या निवेदनात देखील सांगितले होते. वॉर्नर हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी विदेशी बॅट्समन आहे.