RR vs RCB, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीग 13च्या आजच्या डबल हेडरमधील पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला जाईल. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघांमधील सामना सुरू होईल. राजस्थानसाठी हा सामना खूप महत्वाचा ठरणार आहे तर या सामन्यात बेंगलोरही विजय मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. आजच्या सामन्यात रॉयल्सचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने टॉस जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुणतालिकेत आरसीबीच्या खात्यात 10 गुण आहेत, तर राजस्थान रॉयल्सच्या खात्यात केवळ सहा गुण आहेत. आजच्या सामन्यासाठी आरसीबी आणि रॉयल्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही बदल झाला नाही तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्सने काही बदल केले आहेत. स्मिथच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स संघाने दणदणीत सुरुवात केली, परंतु त्यानंतर त्यांची गाडी वाट चुकली, तर आरसीबीने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. विराट कोहलीला सूर गवसला आहे. बेन स्टोक्सच्या आगमनाने रॉयल्स संघ नक्कीच बळकट झाला आहे परंतु जोस बटलर आणि स्टोक्सच्या सलामी जोडीला खेळपट्टीवर टिकून खेळावे लागेल. (RR vs RCB, IPL 2020 Live Streaming: राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)
राजस्थानसाठी रॉबिन उथप्पा आणि बेन स्टोक्सची नवीन जोडी सलामीला येईल. कर्णधार स्मिथ, संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, रियान पराग मधल्या फळीची जबाबदार सांभाळतील. राहुल तेवतिया आणि जोफ्रा आर्चर रॉयल्सचे दमदार अष्टपैलू खेळाडू आहेत. आर्चरसह श्रेयस गोपाल, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी गोलंदाजीत प्रभाव पडण्याचा प्रयत्न करतील. दुसरीकडे, आरसीबीने प्लेइंग इलेव्हनमधून शिवम दुबे आणि मोहम्मद सिराजला बाहेर केले असून त्यांच्या जागी गुरकीरत सिंह मान आणि शाहबाज अहमद यांना साधी दिली. रॉयल्सविरुद्ध शाहबाज अहमद आज आपला पहिला आयपीएल सामना खेळेल.
पाहा आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन
आरसीबीः आरोन फिंच, देवदत्त पडीक्कल, विराट कोहली (कॅप्टन), एबी डिव्हिलियर्स (विकेटकीपर), गुरकीरत सिंह मान, वॉशिंग्टन सुंदर, क्रिस मॉरिस, शाहबाज अहमद, इसरू उदाना, नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहल.
राजस्थान रॉयल्सः बेन स्टोक्स, जोस बटलर, स्टिव्ह स्मिथ (कॅप्टन), संजू सॅम, रॉबिन उथप्पा, रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी.