RR vs DC IPL 2021: दिल्लीविरुद्ध धमाल करून सामना जिंकणाऱ्या Chris Morris याला लिलावत किती पैसे मिळाले हे जाणून तुमचं तोंड बंद होणार नाही!
क्रिस मॉरिस आणि जयदेव उनाडकट (Photo Credit: PTI)

RR vs DC IPL 2021: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल (IPL) 2021 च्या सातव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) तीन विकेटने धुव्वा उडवला. दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 147 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात 42 धावांवर पाच विकेट गमावणाऱ्या रॉयल्सने दोन चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले. क्रिस मॉरिस (Chris Morrsi) आणि डेविड मिलर (David Miller) राजस्थानच्या या विजयाचे नायक ठरले. मिलरने 43 चेंडूत 62 धावांचा स्फोटक डाव खेळला. या दरम्यान त्याने सात चौकार आणि दोन षटकार देखील लगावले तर मॉरिसने निर्णायक क्षणी सूत्रे हाती घेत 18 चेंडू चार षटकारांच्यामदतीने नाबाद 36 धावा केल्या. मॉरिसची आजची खेळी महत्वाची ठरली कारण यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या आयपीएल लिलावात (IPL Auction) रॉयल्सने रेकॉर्ड 16.25 कोटी रुपयात खरेदी केले होते त्यामुळे आजच्या सामन्यात संघाच्या विजया दक्षिण आफ्रिकी अष्टपैलूने पैसावसूल कामगिरी केली असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. (RR vs DC IPL 2021 Match 7: David Miller चे अर्धशतक, Chris Morris याची पैसावसूल बॅटिंग; थरारक सामन्यात राजस्थानने 3 विकेटने हिसकावला दिल्लीच्या हातातून सामना!)

इंडियन प्रीमियर लीगमध्ये आजवर झालेल्या खेळाडूंच्या लिलावात कोणत्याही खेळाडूला मिळेल सर्वात मोठी रक्कम मॉरिसला मिळाली आहे. यापूर्वी युवराज सिंहवर आयपीएल 2015 लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल्सने सर्वाधिक 16 कोटींची बोली लगावली होती. त्यानंतर यंदाच्या लिलावात मॉरिसने सर्वाधिक बोली आकर्षित करत युवीचा रेकॉर्ड मोडला जे पाहून अनेकांची तोंडं उघडीच्या उघडी राहिली. मॉरिसने लिलावासाठी आपली बेस प्राईस 75 लाख ठेवली होती. विशेष म्हणजे लिलावात या दक्षिण आफ्रिकी क्रिकेटरसाठी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात लिलावात चुरस रंगली होती. दुसरीकडे, अखेरच्या हंगामात क्रिस आरसीबीकडून खेळला होता पण तिथे त्याला कामाला करण्याची कमीच संधी मिळाली होती.

दरम्यान, आयपीएलच्या सात सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पहिल्या स्थानावर आहे तर रॉयल्स विरोधात पराभवामुळे दिल्लीची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. कॅपिटल्सना आजच्या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत आघाडीवर पोहचण्याची संधी होती मात्र त्यांनी आपल्या चुकांनी ती गमावली. शिवाय, दिल्लीच्या पराभवाचा मुंबई इंडियन्सना फायदा झाला आणि त्यांनी दुसऱ्या स्थानावर झेप घेतली तर राजस्थान संघ देखील पाचव्या स्थानी पोहचला आहे.