RR vs DC IPL 2021: आयपीएल (IPL) 2021 सामन्यादरम्यान अंदाज वर्तवण्यासाठी वसीम जाफर (Wasim Jaffer) यांनी गुप्त संदेश पोस्ट करण्याची प्रथा सुरू ठेवली. स्पर्धेतील 7व्या सामन्यात रिषभ पंतचे दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) भिडणार आहेत. सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 14 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामन्यापूर्वी जाफरने हास्यास्पद मेसेज देण्यासाठी अमीर खानच्या क्रिकेटवर आधारित 'लगान' (Lagaan) चित्रपटातील एका दृश्याचा फोटो ट्विट केला. एकेवेळी आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व करणाऱ्या अश्विनने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात जोस बटलरला मंकडींग (Mankading) आऊट केले होते. अश्विन आता दिल्ली कॅपिटल्स संघात सामील झाला आहे, तर बटलर अद्यापही राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. (RR vs DC IPL 2021: राजस्थानविरुद्ध R Ashwin याला खुणावतोय ‘हा’ विक्रम, फक्त 1 विकेट घेताच इतिहास रचण्याची फिरकीपटूला सुवर्णसंधी)
दोन संघात होणाऱ्या सामन्यापूर्वी जाफरने 2019 मध्ये मंकडींग घटनेचा संदर्भ देत राजस्थान रॉयल्सला चेतावणी दिली. चित्रपटात, एका भारतीय तरूणाला ब्रिटिश क्रिकेटपटूने मंकडींग आऊट केले होते. “आज रात्री या दोघांपासून सावधान,” जाफरने ट्विटरवर हसणार्या इमोजीसह पोस्ट केले. राजस्थान रॉयल्सने जाफरच्या पोस्टवर त्वरित प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्याच्या ट्विटला प्रत्युत्तर देण्यासाठी त्याच चित्रपटातील आणखी एक मिम शेअर केली. 2019 आयपीएलमध्ये अश्विन आणि बटलर मंकडींग आऊटमध्ये सामील होते. त्यानंतर सोशल मीडियावर हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला होता ज्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 15, 2021
222 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला पंजाब किंग्जविरुद्ध आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात 4 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. कर्णधार संजू सॅमसनने धावांचा पाठलाग करताना 63 चेंडूंत 119 धावा ठोकल्या पण राजस्थानला पराभवाला सामोरे जावे लागले असल्याने सॅमसनचे प्रयत्न व्यर्थ ठरले. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने आपल्या मोसमातील सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला 7 गडी राखून आरामात पराभूत केले आणि आज रात्री वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध सलग दुसऱ्या विजयासाठी मैदानात उतरेल.