 
                                                                 Rajasthan Royals vs Chennai Super Kings: राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) 2025 मधील डबल हेडरचा दुसरा सामना 30 मार्च (रविवार) रोजी गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. राजस्थान रॉयल्ससाठी (Rajasthan Royals) हा सामना खूप महत्त्वाचा असेल, कारण संघाला सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत राजस्थान रॉयल्सने विजयाचे खाते उघडलेले नाही. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जने एक सामना जिंकला आहे आणि एक गमावला आहे. आजच्या सामन्यापूर्वी गुवाहाटीतील हवामान आणि बारसापारा क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीवर नजर टाकूयात.
गुवाहाटी हवामान
राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना 30 मार्च (रविवार) रोजी खेळला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. सामन्यादरम्यान, गुवाहाटीमध्ये पावसाची शक्यता नाही. दिवसाचे तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान असेल, तर सामन्यादरम्यान तापमान 21 ते 24 अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते. या सामन्यात हवामान कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करणार नाही आणि संपूर्ण सामना खेळवला जाईल.
बारसापारा क्रिकेट स्टेडियमचा खेळपट्टीचा अहवाल
गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी पारंपारिकपणे संतुलित मानली जाते. खेळपट्टीचा पृष्ठभाग थोडा कोरडा आहे. दव नसल्यास फिरकीपटूंना मदत होण्याची शक्यता असते. सामना जसजसा पुढे जाईल तसतसे फिरकी गोलंदाज प्रभावी ठरू शकतात. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. हा सामनाही उच्च धावसंख्या नोंदवण्याची अपेक्षा आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
