Royal Challengers Bengaluru vs Mumbai Indians IPL 2025: सोमवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल (IPL 2025) सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) मुंबई इंडियन्सचा () 12 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 5 विकेटच्या मोबदल्यात 221 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई संघाला 9 विकेटच्या मोबदल्यात फक्त 209 धावा करता आल्या. मुंबईकडून तिलक वर्माने 29 चेंडूत 56 धावा आणि हार्दिक पंड्याने 15 चेंडूत 42 धावा केल्या. आरसीबीकडून कृणाल पंड्याने सर्वाधिक 4 विकेट घेतले. या सामन्यात, कृणाल पंड्याच्या शेवटच्या षटकाने सामन्याचा मार्ग बदलला. कृणालसह यश दयाल आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतले.
शेवटच्या षटकात कृणाल पांड्या चमकला
मुंबई इंडियन्सला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात 19 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी मिचेल सँटनर आणि नमन धीर क्रीजवर होते. या महत्त्वाच्या वेळी, आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने कृणाल पंड्याकडे चेंडू सोपवला, ज्याची पूर्वीची कामगिरी फारशी चांगली नव्हती. त्याने 3 षटकांत 39 धावा देत फक्त 1 विकेट घेतली. पण शेवटच्या षटकात कृणालने खेळाचे चित्र उलटे केले.
सामन्यातील विकेट्स
पहिल्याच चेंडूवर सँटनर (8) धावांवर बाद झाला. दुसऱ्या चेंडूवर त्याने दीपक चहरलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर ट्रेंट बोल्ट फलंदाजीला आला आणि त्याने एक धाव घेतली आणि नमन धीरला स्ट्राईक दिला. त्यानंतर मुंबईला 3 चेंडूत 17 धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर चौकार मारून नमनने काही आशा दाखवली. पण, पाचव्या चेंडूवर कृणालने त्याला बाद केले. शेवटच्या चेंडूवर बुमराहला एकही धाव करता आली नाही. अशाप्रकारे, कृणाल पंड्याने शेवटच्या षटकात 3 विकेट्स घेत आरसीबीला गौरवशाली आणि संस्मरणीय विजय मिळवून दिला.