
Royal Challengers Bengaluru Women vs Gujarat Giants Women 12th Match: महिला प्रीमियर लीगचा 12 वा सामना आज म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला आणि गुजरात जायंट्स महिला यांच्यात बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. आरसीबीने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. ज्यामध्ये आपण 2 जिंकले आहे आणि 2 मध्ये पराभव मिळाला आहे. अशा परिस्थितीत, बेंगळुरू संघ तिसरा विजय नोंदवण्याच्या इराद्याने या सामन्यात प्रवेश करेल. दुसरीकडे, गुजरात जायंट्सनेही आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये तीनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आणि एकामध्ये विजय मिळाला आहे. अशा परिस्थितीत आपल्याला एक रोमांचक सामना पाहायला मिळेल.
किती वाजता सुरु होणार सामना?
महिला प्रीमियर लीग 2025 चा सातवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला आणि गुजरात जायंट्स महिला यांच्यात गुरुवार, 27 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे खेळला जाईल. तर टॉसची वेळ त्यापूर्वी अर्धा तास असेल. (हे देखील वाचा: IPL 2025: केविन पीटरसन दिल्ली कॅपिटल्समध्ये दाखल, आयपीएलच्या नवीन हंगामात मिळाली मोठी जबाबदारी)
कुठे पाहणार लाईव्ह सामना?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला आणि गुजरात जायंट्स महिला यांच्यातील महिला प्रीमियर लीग 2025 चा 12 वा सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 वाहिन्यांवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय, तुम्ही जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता.
दोन्ही संघांचे खेळाडू
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघ: स्मृती मानधना (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), डॅनिएल वायट-हॉज, एलिस पेरी, कनिका आहुजा, जॉर्जिया वेअरहॅम, किम गार्थ, राघवी बिस्ट, स्नेह राणा, एकता बिश्त, रेणुका सिंग ठाकूर, सब्बिनेनी मेघना, नुझहत परवीन, हीदर ग्राहम, चार्लोट डीन, जगरावी पवार, प्रेमा रावत, जोशिता व्हीजे.
गुजरात जायंट्स महिला संघ: बेथ मुनी (विकेटकीपर), अॅशले गार्डनर (कर्णधार), हरलीन देओल, फोबी लिचफिल्ड, काशवी गौतम, डिएंड्रा डॉटिन, तनुजा कंवर, भारती फुलमाली, सिमरन शेख, मेघना सिंग, प्रिया मिश्रा, डॅनियल गिब्सन, मन्नत कश्यप, शबनम मोहम्मद शकील, प्रकाशिका नाईक, दयालन हेमलथा, सायली सातघरे, लॉरा वोल्वार्ड.