Rohit Sharma And Sachin Tendulkat (Photo Credit - X)

Rohit Sharma New IPL Record: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Hyderabad, Rajiv Gandhi International Stadium) सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (MI vs SRH) यांच्यात आयपीएल 2024 (IPL 2024) चा आठवा सामना खेळला जात आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma) या सामन्याचा भाग होताच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने विराट कोहली (Virat Kohli) आणि एमएस धोनीच्या (MS Dhoni) नावाचा समावेश असलेल्या क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. (हे देखील वाचा: Shubman Gill Fined: गुजरात टायटन्सचा कर्णधार गिलवर BCCI ची मोठी कारवाई, भरावा लागणार इतक्या लाखाचा दंड)

रोहितच्या नावावर झाला हा ऐतिहासिक विक्रम 

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळाडू म्हणून 200 वा सामना खेळत आहे. यासह तो आयपीएलमध्ये एका संघासाठी 200 सामने खेळणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या आधी हा पराक्रम विराट कोहली आणि एमएस धोनीने केला होता. विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून 200 सामने खेळले आहेत. तर एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जसाठी हा पराक्रम केला आहे.

आयपीएल मध्ये एका संघासाठी 200 सामने खेळलेले खेळाडू

239 सामने - विराट कोहली, RCB

222 सामने - एमएस धोनी, CSK

200 सामने - रोहित शर्मा, MI

अशी कामगिरी करणारा मुंबई इंडियन्सचा पहिला खेळाडू

मुंबई इंडियन्सकडून 200 सामने खेळणारा रोहित शर्मा पहिला खेळाडू ठरला आहे. रोहित शर्मा 2011 पासून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. रोहितने आयपीएल 2013 ते 2023 पर्यंत संघाचे नेतृत्वही केले होते. या काळात त्याने मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवले. त्याचवेळी रोहितने मुंबईसाठी आतापर्यंत 5084 धावा केल्या आहेत.

मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक सामने खेळलेले खेळाडू

रोहित शर्मा - 200 सामने

किरॉन पोलार्ड - 189 सामने

हरभजन सिंग - 136 सामने

लसिथ मलिंगा - 122 सामने

जसप्रीत बुमराह - 121 सामने