
India vs Bangladesh: भारतीय संघाचे सुपरस्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता हे दोन्ही खेळाडू केवळ एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्येच खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे, या दोन्ही दिग्गजांच्या मैदानावरील पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, नवीन अहवालानुसार, कोहली आणि रोहितच्या चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते. दोन्ही खेळाडू आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उशिराने परतणार आहेत आणि यामुळे बीसीसीआय (BCCI) देखील अडचणीत सापडली आहे. (हे देखील वाचा: IND vs ENG 2nd Test 2025: एजबेस्टनमध्ये बुमराहला न खेळवून टीम इंडियाने मोठी चूक केली का? हा निर्णय महागात तर नाही पडणार?)
🚨 THE RETURN OF ROHIT & VIRAT TO BE DELAYED 🚨
- India tour to Bangladesh is likely to be rescheduled due to the pending clearance from the Indian Government. [AFP] pic.twitter.com/hxTAuIUuj1
— Johns. (@CricCrazyJohns) July 2, 2025
रोहित-विराटच्या पुनरागमनाला विलंब
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार होता, जिथे 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने खेळायचे होते. या बांगलादेश दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारत सरकारकडे परवानगी मागितली होती. मात्र, भारत सरकार या दौऱ्याला परवानगी देण्यात विलंब करत आहे. यामुळेच, रिपोर्ट्सनुसार, ही मालिका पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, विराट कोहली आणि रोहित शर्मा 17 ऑगस्ट रोजी मैदानात दिसणार नाहीत. या दोन्ही स्टार खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाला सध्या आणखी उशीर होऊ शकतो.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पुनरागमन करण्याची शक्यता
विराट कोहली आणि रोहित शर्मा आता 19 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतात. ऑक्टोबर महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे, जिथे 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने खेळायचे आहेत. या मालिकेतील पहिला सामना 19 ऑक्टोबर रोजी पर्थ येथे खेळवला जाईल. बांगलादेश दौऱ्याला उशीर झाल्यामुळे, हे दोन्ही दिग्गज खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसू शकतात. आयपीएल 2025 नंतर हे दोन्ही खेळाडू सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. रिपोर्ट्सनुसार, हे दोन्ही खेळाडू 2027 चा एकदिवसीय विश्वचषक खेळण्याचे लक्ष्य ठेवून आहेत. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये त्यांनी शेवटचा सामना 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला होता.